Dhruv Jurel | MS Dhoni X/BCCI and Instagram/
क्रीडा

Dhruv Jurel: 'पंतने लवकर परत यावे, पण जुरेलकडे धोनीपर्यंत पोहोचण्याची क्षमता', माजी कर्णधाराचा विश्वास

Anil Kumble on Dhruv Jurel: ध्रुव जुरेलकडे एमएस धोनी त्याच्या कारकिर्दीत जिथे पोहचला, तिथे पोहचण्याची क्षमता असल्याचा विश्वास माजी भारतीय कर्णधाराने व्यक्त केला आहे.

Pranali Kodre

Anil Kumbai Said Dhruv Jurel has credentials to reach at MS Dhoni

भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्ध रांचीमध्ये झालेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासाठी भारतीय संघाने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

चौथ्या सामन्यातील भारताच्या विजयात यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने मोलाचा वाटा उचलला. आता त्याच्या कामगिरीमुळे मात्र संघव्यवस्थानेला हवाहवासा वाटणारी डोकेदुखी झाली आहे.

या सामन्यानंतर अशी चर्चा सुरू झाली आहे की जेव्हा ऋषभ पंत भारतीय संघात पुनरागमन करेल, तेव्हा जुरेलला स्थान दिले जाणार की नाही.

जुरेलने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या कसोटीतही ४६ धावांची चांगली खेळी केली होती.

तसेच त्याने रांचीमध्ये पहिल्या डावात 90 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर दुसऱ्या डावातही शुभमन गिलबरोबर 72 धावांची मॅच विनिंग भागीदारी करताना नाबाद 39 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

दरम्यान, पंतचा डिसेंबर 2022 च्या अखेरीस गंभीर कार अपघात झाला होता. त्यामुळे तो गेली दीडवर्षे क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज म्हणून कसोटीत केएस भरतला अधिक पसंती देण्यात आली होती. परंतु, त्याला मिळालेल्या संधीमध्ये फार खास काही करता आले नाही.

तसेच इशान किशनलाही संधी दिली गेली, परंतु दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान मानसिक थकव्याच्या कारणाने त्याने माघार घेतली. त्यानंतरही इंग्लंडविरुद्ध सध्या चालू असलेल्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात यष्टीरक्षक म्हणून केएस भरतला खेळवण्यात आले होते. परंतु, त्यातही तो काही करू शकला नाही.

त्यानंतर जुरेलला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्यानेही या संधीचा फायदा उचलला. मात्र आता पंतही पुढील काही महिन्यात भारताकडून पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्याचीही यापूर्वी भारताकडून कसोटीत शानदार कामगिरी राहिली आहे. त्यामुळे आता त्या दोघांमध्ये भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा असणार आहे.

याबद्दल जिओ सिनेमाशी बोलताना माजी भारतीय कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे म्हणाला, 'हो, ऋषभ पंत आहे. तो परत कधी येणार आहे, हे आपल्याला माहित नाही, पण आशा आहे तो लवकर येईल. तथापि, जुरेलमध्ये ते सर्व गुण आहेत, जे त्याला एमएस धोनी त्याच्या कारकिर्दीत जिथे पोहचला तिथे पोहचवू शकतात.'

'जुरेलने आक्रमक खेळतानाही त्याच्याकडे बचाव करण्याची तंत्रही असल्याचे दाखवून दिले आहे. रांचीमध्येही पहिल्या डावात तळातल्या फलदाजांबरोबर फलंदाजी करतानाही त्याला त्याच्याबद्दल इतकी खात्री होती की तो कधी गोलंदाजांविरुद्ध आक्रमण करू शकतो आणि मोठे षटकात मारू शकतो.'

कुंबळने जुरेलचे त्याच्या यष्टीरक्षणाबद्दलही कौतुक केले. कुंबळे म्हणाला, 'यष्टीरक्षणावेळीही त्याने दाखवलेल्या कौशल्याबद्दलही कौतुक करायला हवं. त्याचे यष्टीरक्षणही चांगले होते, विशषत: वेगवान गोलंदाज गोलंदाजी करत असताना.'

'फिरकी गोलंदाजांच्या गोलंदाजीवरही त्याने काही चांगले झेल घेतले आणि तो यातून प्रगतीच करत जाणार आहे. हा त्याचा केवळ दुसरा कसोटी सामना होता आणि मला खात्री आहे की जसाजसा तो आणखी खेळत जाईल, तसातसा तो आणखी चांगला होत जाईल. हे भारतीय संघासाठी चांगलेच आहे.'

याशिवाय जुरेलला कसोटीत पदार्पण करण्यापूर्वी केवळ 15 प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव असतानाही त्याच्यावर निवडसमितीने दाखवलेल्या विश्वासाबद्दलही कुंबळेने कौतुक केले आहे.

कुंबळे म्हणाला, 'त्याला संघात घेणे चांगले होते. मला माहित आहे हे केएस भरतसाठी सोपे नसेल. पण मी म्हणालो की निवडकर्त्यांचा हे मोठे पाऊल होते की त्याची फक्त 15 प्रथम श्रेणी सामने खेळताना पाहिले असतानाही निवड करण्यात आली आणि त्याला तिसऱ्या कसोटीत पदार्पणाचीही संधी दिली. तेव्हापासून त्याचीही कामगिरी चांगली राहिली आहे.'

उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या जुरेलने कसोटीत पदार्पण करण्यापूर्वी 15 प्रथम श्रेणी सामने खेळले होते, ज्यात त्याने 790 धावा केल्या होत्या. यात एका शतकाचा आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT