IND Vs ENG: डेब्यू टेस्ट सीरीजमध्ये 'ध्रुव' चमकला; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय यष्टीरक्षक

Dhruv Jurel First Wicket Keeper Record Debut Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियाने रांची कसोटीत पाच गडी राखून शानदार विजय नोंदवला.
Dhruv Jurel First Wicket Keeper Record Debut Test Series
Dhruv Jurel First Wicket Keeper Record Debut Test SeriesANI

Dhruv Jurel First Wicket Keeper Record Debut Test Series:

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियाने रांची कसोटीत पाच गडी राखून शानदार विजय नोंदवला आणि मालिकाही जिंकली. ध्रुव जुरेल रांची कसोटीत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला, ज्याच्या कारकिर्दीतील हा फक्त दुसरा कसोटी आणि आंतरराष्ट्रीय सामना होता.

याआधी त्याला राजकोट कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. त्याने पदार्पणाच्या डावात 46 धावा केल्या मात्र दुसऱ्या डावात फलंदाजी केली नाही. त्यानंतर रांची कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 95 धावांची खेळी करत टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले आणि धावसंख्या तीनशेच्या पुढे नेली.

ध्रुव तीन डावात चमकला

दरम्यान, रांची कसोटीच्या दुसऱ्या डावातही टीम इंडिया 192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली होती, तेव्हा एकवेळ जडेजा आणि सर्फराजच्या लागोपाठ विकेट पडल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. तिथून ध्रुव जुरेलने शुभमन गिलला साथ देत टीम इंडियाला विजयापर्यंत नेले. त्याने 39 धावांची नाबाद खेळी खेळली. आतापर्यंत त्याने तीन डावात 87 च्या सरासरीने 175 धावा केल्या आहेत. रांची कसोटीतही तो 'सामनावीर' म्हणून निवडला गेला. यासह त्याने आपले नाव रेकॉर्डच्या यादीत समाविष्ट केले आहे.

Dhruv Jurel First Wicket Keeper Record Debut Test Series
IND vs ENG, Test: इंग्लंडचे मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले, गिल-जुरेलने केला टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब

22 वर्षांनंतर अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय यष्टीरक्षक

यासह, ध्रुव जुरेल 22 वर्षात पदार्पणाच्या कसोटी मालिकेत 'सामनावीर' पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला. गेल्या 22 वर्षांत, एमएस धोनी, ऋषभ पंत सारखे महान यष्टिरक्षक फलंदाज टीम इंडियासाठी आले आहेत, परंतु त्यांच्या पदार्पणाच्या मालिकेत कोणालाही असे करता आले नाही. आता ध्रुव जुरेल हा गेल्या 22 वर्षात अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.

Dhruv Jurel First Wicket Keeper Record Debut Test Series
IND vs ENG: 'त्यांनाच संधी देणार, ज्यांच्यात कामगिरी करण्याची भूक आहे', रांची कसोटीनंतर रोहित काय म्हणाला? वाचा

घरच्या मैदानावर भारताचा सलग 17 वा टेस्ट विजय

टीम इंडियाने 2012 पासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. टीम इंडियाने 2012 पासून आतापर्यंत 17 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. मायदेशात टीम इंडियाचा हा शानदार रेकॉर्ड आहे. तर बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने पहिली कसोटी मालिका गमावली आहे. भारतासाठी आतापर्यंतच्या संपूर्ण मालिकेत युवा खेळाडूंची कामगिरी पाहायला मिळाली. यशस्वी जयस्वालने दोन द्विशतकांसह 600 हून अधिक धावा केल्या आहेत. तर ध्रुव जुरेल आणि सर्फराज खान यांनी पदार्पणानंतर आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com