Angelo Mathews X/ICC
क्रीडा

Timed Out: 'व्हिडिओचा पुरावा तर...' ICC च्या पोस्टवर मॅथ्यूजचे सडेतोड उत्तर

Pranali Kodre

Angelo Mathews says he has Video Proof on Timed Out:

वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये सोमवारी (6 नोव्हेंबर) श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात सामना खेळला गेला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने 3 विकेट्सने विजय मिळवला.

मात्र, या सामन्यात अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट दिल्याने बराच वाद झाला. याबद्दल आयसीसीकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले, पण मॅथ्यूजने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

नक्की झाले काय?

या सामन्यात श्रीलंका प्रथम फलंदाजीला उतल्यानंतर 25 व्या षटकात ही वादग्रस्त घटना घडली. या षटकात दुसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला उतरणार होता, तो मैदानात आलाही, पण पहिला चेंडू खेळण्यापूर्वीच हेल्मेटची काहीतरी समस्या झाल्याने परत गेला.

त्यावेळी बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि संघाने त्याच्याविरुद्ध टाईम आऊट नियमानुसार बादसाठी पंचांकडे अपील केले. पंचांनाही नियमानुसार त्याला बाद द्यावे लागले.

दरम्यान, चौथे पंच एड्रियन होल्डस्टॉक यांनी नंतर स्पष्ट केले की मॅथ्यूजच्या हेल्मेटची स्ट्रॅप तुटण्यापूर्वीच वेळ संपला होता.

मॅथ्यूजने चौथ्या पंचांना म्हटले चूकीचे

दरम्यान, आयसीसीच्या पोस्टवर उत्तर देताना मॅथ्यूजने म्हटले की 'इथे चौथे पंच चुकीचे आहेत. व्हिडिओ साक्षी आहे की हेल्मेट खराब होण्याआधीही माझ्याकडे ५ सेकंद आणखी होते. चौथे पंच यात सुधारणा करू शकतात का? मला असे वाटते की खेळाडूची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. कारण मी हेल्मेटशिवाय गोलंदाजांचा सामना करू शक नाही.'

त्यानंतर त्याने दोन फोटो पोस्ट केले आहेत. त्यात समरविक्रमाची विकेट गेलेली दिसत आहे, त्यानंतक दोन मिनिटांच्या आज मॅथ्यूज क्रिजवर आलेला दिसत आहे.

त्याने याबद्दल लिहिले की 'पुरावा, झेल घेण्याच्या वेळेपासून माझ्या हेल्मेटच्या स्ट्रॅप तुटण्यापर्यंतची वेळ.'

नियम काय सांगतो?

आयसीसीच्या नियमानुसार विकेट गेल्यानंतर किंवा एखादा फलंदाज रिटायर झाल्यानंतर पुढच्या फलंदाजाने 2 मिनिटांच्या आत क्रीजपर्यंत येणे गरजेचे असते, तसेच चेंडू खेळण्यासाठी तयार राहणे महत्त्वाचे असते, जर असे झाले नाही, तर त्या फलंदाजाच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ टाईम आऊटसाठी अपील करू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT