Ambati Rayudu  Dainik Gomantak
क्रीडा

Indian Cricketer Retirement: WTC फायनलपूर्वी मोठी बातमी, 'या' स्टार खेळाडूने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती!

Indian Cricketer Retirement: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 ते 11 जून दरम्यान खेळवला जाणार आहे.

Manish Jadhav

Indian Cricketer Retirement: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 ते 11 जून दरम्यान खेळवला जाणार आहे. हा मोठा सामना लंडनच्या ओव्हल क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.

या सामन्यासाठी संघातील अनेक खेळाडू इंग्लंडला पोहोचले आहेत. दरम्यान, टीम इंडियाच्या एका दिग्गज क्रिकेटपटूने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या खेळाडूने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे.

या क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली

टीम इंडियासाठी एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळणाऱ्या अंबाती रायडूने (Ambati Rayudu) निवृत्ती जाहीर केली आहे. रायडूने स्वत: त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली. त्याने लिहिले की, मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे.

मी लहानपणी पहिल्यांदा क्रिकेटची बॅट धरली होती, तेव्हा मी घरात टेनिस बॉलने खेळायचो. त्यादरम्यान, माझ्या या अद्भुत प्रवासाची मी कल्पनाही केली नव्हती, परंतु माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की, मी माझ्या देशाचे 15 वर्षांखालील ते राष्ट्रीय संघात प्रतिनिधित्व केले.'

दोन दिवसांपूर्वी आयपीएलच्या निवृत्तीची घोषणा करण्यात आली

आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या अंबाती रायडूने 28 मे रोजी अंतिम सामन्यापूर्वी लगेचच आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

त्याने ट्विटमध्ये लिहिले होते की, 'CSK आणि गुजरात 2 सर्वोत्तम संघ, 204 सामने, 14 हंगाम, 11 प्लेऑफ, 8 फायनल, 5 ट्रॉफी. बराच लांबचा प्रवास झाला. मी ठरवले आहे की, आज रात्रीचा अंतिम सामना हा माझा आयपीएलमधील शेवटचा सामना असेल. ही मोठी स्पर्धा खेळताना मला खूप आनंद झाला. तुम्हा सर्वांचे आभार.'

टीम इंडियाकडून एकदिवसीय आणि टी-20 खेळला

अंबाती रायडूच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तो भारतीय क्रिकेटसाठी खेळला आणि त्याने 55 एकदिवसीय सामन्यांमध्ये 47.06 च्या सरासरीने आणि 79.05 च्या स्ट्राइक रेटने 1694 धावा केल्या.

यादरम्यान त्याच्या बॅटमधून 3 शतके आणि 10 अर्धशतकेही झळकली. त्याची सर्वोच्च धावसंख्या 124 धावांची होती.

त्याचवेळी, त्याला टी-20 मध्ये 7 सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने 61 धावा केल्या. 2010 मध्ये आयपीएल कारकिर्दीची सुरुवात करणारा अंबाती रायडू चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचा भाग राहिला आहे. रायुडू 2018 पासून सीएसकेकडून खेळत होता.

विशेष म्हणजे, त्याने आयपीएलमध्ये (IPL) आतापर्यंत 203 सामन्यांत 28.05 च्या सरासरीने 4348 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 22 अर्धशतक आणि 1 शतक झळकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT