Tennis Tournament dainik gomantak
क्रीडा

Tennis Tournament : अमन, अँड्र्यू, अश्विन उपउपांत्यपूर्व फेरीत

गोव्याच्या तेजस शेवडे, तसेच अनंत कोचर यांनीही चमकदार विजयाची नोंद

दैनिक गोमन्तक

पणजी : अमन शेट्टी, अँड्र्यू, अश्विन नरसिंघानी यांनी गद्रे गास्पार डायस खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. याशिवाय गोव्याच्या तेजस शेवडे, तसेच अनंत कोचर यांनीही चमकदार विजयाची नोंद केली. (Aman, Andrew, Ashwin reach semifinals of Gadre Gaspar Dias Open Tennis Tournament)

स्पर्धेतील सामने मिरामार (Miramar) येथील क्लब टेनिस द गास्पार डायस व कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या टेनिस कोर्टवर खेळले जात आहेत. पुरुष (Men) एकेरीतील तिसऱ्या फेरीत अमनने काफिल कडवेकर याच्यावर ६-३ फरकाने मात केली. अँड्र्यू याला पुढील फेरीसाठी टायब्रेकरमध्ये अर्शद देसाई याच्यावर ७-६ (४) असा विजय नोंदवावा लागला. अश्विनने जोसेफ पोर्थर याला ६-२ फरकाने नमविले.

गतविजेत्या व्ही. प्रणीथ याने जस्सिन चत्ताराम याला ६-० फरकाने लीलया हरविले. चार वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या गोव्याच्या गतउपविजेत्या तेजस शेवडे यानेही एकतर्फी विजयाची नोंद करताना हरकिरत सिंग याला ६-० फरकाने हरविले. तनय आमोणकर याने यश लिंगुडकर याला ६-० असे, तर अनंत कोचरने मनोज लोहिया याला ६-१ फरकाने पराजित केले.

पुरुष एकेरीतील अन्य लढतीत गोव्याच्या (Goa) समीर काकोडकरने जीतू मेलवानी याच्यावर ६-१ असा, वीर कोतवालने शरद मिश्रा याच्यावर ६-० असा, भालचंद्र याने प्रणब मेहरिशी याच्यावर ६-३ असा, तर रजत परमारने क्षितीज याच्यावर ६-१ असा विजय प्राप्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT