Alyssa Healy X
क्रीडा

INDW vs AUSW: आऊट की नॉट आऊट? जेमिमाहने घेतलेल्या हेलीच्या कॅचवर ड्रामा, वाचा नक्की काय झालं

Alyssa Healy's Catch: हेलीला मिळालेलं जीवदान भारताला पडलं महागात? वाचा नक्की काय झालेलं

Pranali Kodre

India Women vs Australia Women, 3rd T20I Match at Mumbai, Alyssa Healy Catch Controversy:

ऑस्ट्रेलिया महिला संघाने मंगळवारी (9 जानेवारी) भारतीय महिला संघाविरुद्धच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना 7 विकेट्सने जिंकला. यासह नवी मुंबई येथील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर झालेल्या या मालिकेत 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. दरम्यान तिसऱ्या टी20 सामन्यात एक नाट्यमय घटना घडली होती.

झाले असे भारताने दिलेल्या 148 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून एलिसा हेली आणि बेथ मुनी फलंदाजीला उतरल्या होत्या. यावेळी 7 व्या षटकात पुजा वस्त्राकर गोलंदाजी आली आणि तिने टाकलेल्या या षटकतील पाचव्या चेंडू हेलीच्या बॅटला लागून बॅकवर्ड पाँइंटला असलेल्या जेमिमाह रोड्रिग्सकडे गेला.

जेमिमानेही जमिनीलगत शानदार झेल घेतला होता. मात्र झेल घेताना तिची बोटं चेंडूखाली आली की नाही की चेंडूचा जमिनीला स्पर्श झाला हे तपासण्याचा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आला.

मात्र चेंडू इतका वेगात होता की रिप्लेमध्ये कोणतेही चित्र स्पष्ट दिसत नव्हते. रिप्ले झुम इन केल्यानंतरही चित्र अत्यंत अस्पष्ट दिसत होतं.

त्यामुळे जेमिमाहने हा झेल पूर्ण केला आहे की नाही हे स्पष्ट होत नव्हते. त्यातच आयसीसीने सॉफ्ट सिग्नलचा निर्णय काढून टाकला असल्याने तिसऱ्या पंचांचा निर्णय अंतिम असतो. यावेळी तिसऱ्या पंचांनाही झेल घेतल्याचा स्पष्ट पुरावा मिळत नसल्याने अखेर तिसऱ्या पंचांनी हेलीला नाबाद घोषित केले.

विशेष म्हणजे जेमिमाहच्या झेलानंतर हेली माघारी जायला निघाली होती, मात्र तिसरे पंच झेल तपासत असल्याने ती थांबली. अखेर तिसऱ्या पंचांनी अपुऱ्या पुराव्यामुळे तिला नाबाद घोषीत केल्याने तिला जीवदान मिळाले. त्यावेळी ती 38 धावांवर खेळत होती. तसेच तिने बेथ मुनीसह 60 धावांची भागीदारी केली होती.

या जीवदानाचा फायदा घेत हेलीने नंतर अर्धशतक झळकावले. तसेच बेथ मुनीसह 85 धावांची सलामी भागीदारी केली. हेली 38 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह 55 धावांची खेळी करून बाद झाली. नंतर ताहलिया मॅकग्रा (20) आणि एलिस पेरी (0)बाद झाल्यानंतर बेथ मुनी (52*) आणि फोबी लिचफिल्ड (17*) यांनी ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला.

भारताकडून गोलंदाजीत पुजा वस्त्राकरने 2 विकेट्स घेतल्या, तर दिप्ती शर्माने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, भारताने 20 षटकात 6 बाद 147 धावा केल्या होत्या. भारताकडून ऋचा घोषने 34 धावांची खेळी केली. अन्य खेळाडूंनीही छोटेखानी खेळी केल्या, मात्र कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून ऍनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वेअरहॅम यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

Money Laundering Case: धर्मांतरण रॅकेटचा मास्टरमाइंड छंगूर बाबाच्या साम्राज्यावर ईडीचा घाला! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 13 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: चांगलीच खोड मोडली! जिवंत कोळंबी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोरीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT