KL Rahul  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी का? KL Rahul चा खुलासा

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 चा अर्धा टप्पा पार पडला आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात स्पर्धेतील 31 वा सामना खेळला जात आहे. 31 सामन्यांमध्ये बरेच काही बदलले. प्लेइंग इलेव्हन बदलले, खेळाडूंचे खेळण्याचे स्थान बदलले, गुणतालिकेतही अनेक चढउतार पाहायला मिळाले. परंतु जर काहीही बदलले नसेल तर तो संघाचा कर्णधार. जो नाणेफेक जिंकतो आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो. शेवटी काय कारण आहे की, आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये नाणेफेक जिंकून सर्व संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहेत. आधी गोलंदाजीच का करत आहे? या प्रश्नाचे उत्तर अखेर लखनौचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) बंगळुरुविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिले आहे. (All teams want to bowl first in IPL 2022 KL Rahul said that they want to chase the target given by the previous team)

दरम्यान, लखनौ आणि बंगळुरु यांच्यातील सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. या मोसमातील हा 31 वा सामना आहे. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकला. नाणेफेक जिंकल्यानंतर, त्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, हा ट्रेंड गेल्या 30 सामन्यांमध्ये देखील पाहायला मिळाला. अशा स्थितीत संघांनी प्रथम गोलंदाजी निवडण्याचे कारण काय, असा प्रश्न राहुलला विचारला असता त्यानं या मागचं गूढ उलघडलं.

नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी का? केएल राहुलने कारण सांगितले

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केएल राहुल म्हणाला, ‘‘टूर्नामेंटमधील सर्व संघांना प्रथम गोलंदाजी करायची आहे. कारण त्यांना आगोदरच्या संघाने उभारलेल्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. या उत्तरानंतर राहुलने लखनौच्या संघावरही शिक्कामोर्तब केला. प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नसल्याचे त्याने स्पष्ट केले.

फॅफ डू प्लेसिसनेही राहुलच्या वक्तव्याचे समर्थन केले

आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसनेही (Faf du Plessis) लखनौचा कर्णधार केएल राहुलने दिलेल्या कारणाला योग्य ठरवले. नाणेफेकही जिंकली असती तर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता असे तो म्हणाला. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. लखनौप्रमाणेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनेही सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT