IPL 2022: BCCI ने घेतला मोठा निर्णय, आता 'इथे' होणार दिल्ली अन् पंजाबचा सामना

आयपीएल 2022 (IPL 2022) चा 32 वा सामना बुधवारी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे.
Delhi Capitals
Delhi Capitals Dainik Gomantak

आयपीएल 2022 चा 32 वा सामना बुधवारी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. यापूर्वी हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार होता. मात्र, दिल्ली संघात (Delhi Capitals) कोरोनानं थैमान घातल्यानंतर बीसीसीआयने BCCI ब्रेबॉर्न स्टेडियमवर आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Delhi Capitals
IPL 2022: 'या' दोन संघांची लीगधून उडाली दांडी ! प्लेऑफमध्ये पोहोचणे बनले अशक्य

बीसीसीआयने शेअर केलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या संघातील पाच सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फरहत, स्पोर्ट्स मेसेज थेरपिस्ट चेतन कुमार, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श, टीम डॉक्टर अभिजित साळवी आणि सोशल मीडिया कंटेंट टीम सदस्य आकाश माने यांच्या नावाचा समावेश आहे.

तसेच, दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यासंदर्भात एक नवी माहिती जारी करताना, बीसीसीआयने म्हटले की, 'दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यातील 32 वा सामना मंगळवारी एमसीए स्टेडियमऐवजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल.'

Delhi Capitals
IPL 2022: शिखर धवनकडे पंजाबचे कर्णधारपद, का होता मयंक अग्रवाल संघाबाहेर?

याशिवाय, दिल्ली कॅम्पमधील फिजिओ पॅट्रिक फरहत शुक्रवारी कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यानंतर मार्शलाही कोरोनाची लक्षणे जाणून आली. दिल्लीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ''दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श कोविड-19 पॉझिटिव्ह आढळला आहे, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमचे वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com