Ahmed Shahzad slams PSL 
क्रीडा

Ahmed Shahzad slams PSL: "IPL च सरस!" 'पीएसएल'वर भडकला पाकिस्तानी स्टार खेळाडू; सांगितल्या 'या' 3 मोठ्या चुका

Ahmed Shahzad slams PSL League: भारतातील इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) धर्तीवर पाकिस्तानने आपली 'पाकिस्तान सुपर लीग' (PSL) सुरू केली खरी, मात्र या दोन्ही लीगमधील दरी आता अधिकच रुंदावत चालली आहे.

Sameer Amunekar

भारतातील इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) धर्तीवर पाकिस्तानने आपली 'पाकिस्तान सुपर लीग' (PSL) सुरू केली खरी, मात्र या दोन्ही लीगमधील दरी आता अधिकच रुंदावत चालली आहे. पाकिस्तानचा माजी सलामीवीर अहमद शहजाद याने पीएसएलच्या दर्जावर अत्यंत कडक शब्दात टीका केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये त्याने आयपीएल ही पीएसएलपेक्षा कित्येक पटीने सरस असल्याचे मान्य करत आपल्याच देशातील क्रिकेट बोर्डाला आणि लीगला घरचा आहेर दिला आहे.

सुपरस्टार्सची कमतरता आणि दर्जाचा अभाव शहजादच्या मते, आयपीएलमध्ये दरवर्षी नवनवीन आणि प्रतिभावान युवा खेळाडू समोर येतात, जे पुढे जाऊन भारतीय क्रिकेटची धुरा सांभाळतात. याउलट, पीएसएलमध्ये अशा दर्जेदार खेळाडूंची वानवा आहे. तो म्हणतो की, पाकिस्तानमध्ये केवळ निवृत्त खेळाडू आणि समालोचकांना मैदानात उतरवून त्यांना 'सुपरस्टार' म्हणून लोकांसमोर सादर केले जाते. यामुळे लीगमध्ये असलेली स्पर्धात्मकता (Competitiveness) पूर्णपणे संपली आहे. जिथे आयपीएल जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंना आकर्षित करते, तिथे पीएसएल केवळ जुन्या नावांवर अवलंबून आहे.

रिजेक्टेड खेळाडूंचा अड्डा? अहमद शहजादने आपल्या टीकेत एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. तो म्हणतो की, ज्या खेळाडूंना आयपीएलच्या लिलावात कोणीही विकत घेत नाही किंवा ज्यांना भारतातून नाकारले जाते, ते खेळाडू नाईलाजास्तव पाकिस्तानमध्ये खेळायला येतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियन दिग्गज डेव्हिड वॉर्नर. आयपीएल २०२६ च्या लिलावात वॉर्नरला कोणत्याही संघाने पसंती दिली नाही, त्यानंतरच त्याने पाकिस्तानच्या लीगचा रस्ता धरला. जोपर्यंत या खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान मिळत होते, तोपर्यंत त्यांनी पीएसएलकडे साधे वळूनही पाहिले नव्हते, असा टोलाही शहजादने लगावला.

अहंकार आणि 'ब्लेम गेम' पाकिस्तान क्रिकेटच्या सध्याच्या परिस्थितीला तिथल्या अधिकाऱ्यांचा 'इगो' (अहंकार) जबाबदार असल्याचे शहजादने म्हटले आहे. आपली चूक मान्य करण्याऐवजी येथील लोक अजूनही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच धन्यता मानतात. "ते लोक वास्तव स्वीकारायला तयार नाहीत आणि आजही फक्त ब्लेम गेम खेळत आहेत," अशा शब्दात त्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. पीएसएलचा मूळ उद्देश युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणे हा होता, मात्र सध्या ही लीग केवळ नावापुरतीच उरली असल्याचे चित्र शहजादच्या विधानावरून स्पष्ट होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

VIDEO: "याच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 पैसे कापा" मोहम्मद रिझवान अन् लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची; बांगलादेशी खेळाडूंनी उडवली खिल्ली

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' सरकारी कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; ओल्ड पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा

Horoscope 20 May 2026: चंद्राचे गोचर घडवणार चमत्कार! बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; व्यवसायातून होणार अफाट धनलाभ

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

SCROLL FOR NEXT