Steve Smith | Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाची WTC Final मध्ये एन्ट्री, पण टीम इंडियाची प्रतिक्षा लांबली; पाहा समीकरण

ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटी भारताला पराभूत करत Test Championship फायनलमध्ये प्रवेश केल आहे, मात्र आता भारतासमोरील समीकरण बदलले आहे.

Pranali Kodre

WTC 2021-23 Final: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर कसोटी मालिकेतील तिसरा सामना पार पडला. या सामन्यात तिसऱ्याच दिवशी (3 मार्च) ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सने विजय मिळवला. याबरोबर मालिकेत भारताची आघाडी 2-1 अशी कमी केली. याबरोबरच ऑस्ट्रेलियाने टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील जागा पक्की केली.

ऑस्ट्रेलियाचा टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेतील हा 18 सामन्यातील 11 वा विजय होता. त्यामुळे आता त्यांनी 68.52 च्या विजयी टक्केवारीसह टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 च्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर कब्जा केला आहे.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचा चौथा सामना बाकी आहे. पण अहमदाबादला होणाऱ्या या सामन्याचा निकाल काहीही लागला, तरी ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 च्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकाला धक्का लागणार नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया या स्पर्धेचा जूनमध्ये अंतिम सामना खेळणार हे निश्चित झाले आहे.

असे आहे समीकरण

दरम्यान, आता भारतीय संघाची या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जाण्याची प्रतिक्षा लांबली आहे. इंदूर कसोटीतील पराभवानंतरही सध्या भारतीय संघ टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 च्या गुणतालिकेत 60.29 च्या विजयी टक्केवारीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

गुणतालिकेतील दुसरे स्थान पक्के करून अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला 9 मार्चपासून अहमदाबादला सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवणे गरजेचे राहणार आहे. जर या सामन्यात विजय मिळवला, तर भारतीय संघही ऑस्ट्रेलियाप्रमाणे अंतिम सामन्यात थेट प्रवेश करेल आणि श्रीलंकेचे या स्पर्धेतील आव्हान संपेल.

पण जर आगामी अहमदाबाद कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली किंवा सामना अनिर्णित राहिला, तर भारताला 9 मार्चपासून न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेवर अवलंबून राहावे लागणार आहे. श्रीलंकेलाही अजून अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची संधी आहे.

जर, भारताला पुढील कसोटी सामना जिंकण्यात अपयश आले आणि श्रीलंका संघाने न्यूझीलंडविरुद्ध 2-0 असा विजय मिळवला, तर भारताचे टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 मधील आव्हान संपुष्टात येईल. पण श्रीलंकेने या मालिकेतील एकही सामना पराभूत झाला किंवा अनिर्णित राहिला, तर मात्र भारतीय संघाचे अंतिम सामन्यातील तिकीट पक्के होईल.

WTC 2021-23 Point Table

इंग्लंडमध्ये रंगणार अंतिम सामना

दरम्यान, टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 चा अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान इंग्लंडमधील लंडनमध्ये असलेल्या द ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी 12 जून हा राखीव दिवसही असेल. आता या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत की श्रीलंका यांच्यातील कोणता संघ खेळणार हे आगामी काळात निश्चित होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT