Hockey Dainik Gomantak
क्रीडा

FIH ने हॉकीच्या नियमांमध्ये केले दोन मोठे बदल, 18 महिन्यांच्या विचारमंथनानंतर निर्णय

दैनिक गोमन्तक

नवीन वर्षाची सुरुवात होताच AFIH ने हॉकीमध्ये (Hockey) मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमांमध्ये केलेले बदल 1 जानेवारी 2022 पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर लागू करण्यात आले आहेत. त्याच वेळी, सर्व देशांना स्वातंत्र्य दिले गेले आहे की, ते त्यांच्या सोयीनुसार देशांतर्गत लीगमध्ये हे नियम लागू करु शकतात. महासंघाने पेनल्टी कॉर्नरबाबत महत्त्वाचा नियम बदलला आहे. गेल्या 18 महिन्यांपासून ते या नियमांवर चर्चा करत होते.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (International Hockey Federation) खेळाडूंसाठी खेळ अधिक सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात पेनल्टी कॉर्नरचा बचाव करणाऱ्या खेळाडूंना चेंडू स्ट्रायकिंग सर्कलच्या बाहेर गेल्यानंतरही संरक्षणात्मक उपकरणे वापरण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी, पेनल्टी कॉर्नरचा बचाव करणाऱ्या खेळाडूंना फ्लिक लागल्यानंतर लगेचच त्यांची सुरक्षा उपकरणे वर्तुळातील बाहेर काढावी लागायची.

आता पेनल्टी कॉर्नर संरक्षण उपकरणे काढावी लागणार नाहीत

FIH ने त्याच्या नियम 4.2 मध्ये सुधारणा केली आहे, जो पेनल्टी कॉर्नरसाठी सुरक्षा उपकरणे काढून टाकण्याशी संबंधित आहे. FIH क्रीडा संचालक आणि दोन वेळचे ऑलिंपियन जॉन वोइट यांनी एका निवेदनात म्हटले आहे, "कायदा 4.2 बदलला आहे. खेळाडू आता त्यांच्या सुरक्षा उपकरणांसह चेंडूसह धावणे सुरु ठेवू शकतात, परंतु त्यांनी 23-मीटर झोनमधून बाहेर पडल्यावर त्वरित उपकरणे काढून टाकणे आवश्यक आहे.

व्याट म्हणाले, "पेनल्टी कॉर्नरसाठी सुरक्षा उपकरणे वापरताना कोणताही खेळाडू 23-मीटर क्षेत्राबाहेर कधीही खेळू शकत नाही." खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हे आणण्यात आले आहे, जेणेकरुन खेळाडूंनी खेळावर अधिक लक्ष केंद्रित करावे आणि त्यांना दबावाच्या परिस्थितीत उपकरणे काढावी लागू नयेत. यास प्रशिक्षक, खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.

एरियल बॉलचे नियमही बदलले

याशिवाय एरियल बॉलच्या नियम 9.10 मध्येही बदल करण्यात आले आहेत. पूर्वीच्या खेळाडूंना एरियल बॉल अडवता येत नव्हता. त्यामुळे खेळाडूंची सुरक्षा धोक्यात आली, असे त्यांचे मत होते. मात्र, आता खेळाच्या विकासासाठी ते महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, खेळाडूंच्या सुरक्षेत कोणतीही चूक होऊ नये यासाठी आता हवाई चेंडूवर लक्ष ठेवले जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Transport Director Issue: सरकार अपघातांबाबत खरंच गंभीर आहे का? मग गोव्याला पूर्णवेळ संचालक का नाहीत?

गोव्याचा अपरिचित इतिहास! कदंब आणि यादव राज्यकर्त्यांचे संबंध; तत्कालीन परकिय आक्रमणांविषयी जाणून घ्या

Goa Driving Licence: गोव्यात 18 ऐवजी 16व्या वर्षीच लायसन्स दिले असते, काँग्रेस नेत्याचे विधान; परदेशात वयोमर्यादा काय?

Calangute News: लवकरच कळंगुटमध्ये होणार प्रशस्त कॉम्प्लेक्स आणि बसस्थानक; टाटा ट्रेन्सच्या साहाय्याने पंचायतीचा पुढाकार

..आता कडक कारवाईच! कचरा फेकणाऱ्यांचा फोटो काढून पोलिसांत तक्रार द्या; गोवा सरकार स्वच्छतेसाठी ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT