'मी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होण्यास तयार': जसप्रीत बुमराह

मी कोणत्याही अतिरिक्त जबाबदारीचा दबाव घेणार नाही...
Jasprit Bumrah
Jasprit BumrahDainik Gomantak
Published on
Updated on

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका भारताने 1-2 ने गमावली आणि विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडले. हे होत असतांनाच भारतीय संघाच्या नजरा आता वनडे मालिका जिंकण्याकडे वळलेल्या आहेत. तर दुसरीकडे कसोटी कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यासाठी रोहित, राहुल, बुमराह आणि पंत या खेळाडूंची नावे समोर येत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी उपकर्णधारपदी निवड झालेल्या जसप्रीत बुमराहने (jasprit Bumrah) पत्रकार परिषदेत सांगितले की, जर मला भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर हा माझ्यासाठी मोठा सन्मान असेल.

Jasprit Bumrah
Ashes मधील पराभवासाठी IPLला जबाबदार धरणाऱ्याला भारतीय प्रशिक्षक म्हणाले...

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) बुधवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी बुमराहने पत्रकार परिषदेत सांगितले की, "माझ्यावर जी कोणती जबाबदारी येइल ती जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे. मला जर संधी मिळाली तर तो माझ्यासाठी सन्मानच ठरेल. कारण कोणता खेळाडू ते नाकारेल? भूमिका कोणतीही जरी असली तरी मला कोणत्याही परिस्थितीत योगदान द्यायचे आहे.”

एकदिवसीय मालिकेसाठी उपकर्णधारपदाच्या जबाबदारीबाबत बुमराह म्हणाला की, ''मी माझ्याकडून होईल तेवढी मदत करेन. फील्ड सेटिंगमध्ये के एल ला मदत करेल. तसेच मी कोणत्याही अतिरिक्त जबाबदारीचा दबाव घेणार नाही. प्रत्येकाला जबाबदारी घ्यायची आहे. माझ्याकडून जमेल ते योगदान देईन. उपकर्णधारपद मिळाले असले, तरी माझ्यावर कोणतेही दडपण नाही.''

Jasprit Bumrah
भाजप सरकारच्या पराभवासाठी कार्यरत व्हा: गिरीश चोडणकर यांचे आवाहन

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा दौरा 2018 मध्ये केला होता. सहा सामन्यांची एकदिवसीय मालिका 5-1 ने जिंकली होती आणि हा दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेतील भारतीय संघाचा पहिला विजय ठरला होता.

दक्षिण आफ्रिका विरुध्द भारतीय टीम मधिल खेळाडू : केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, रुतुराज गायकवाड़, विराट कोहली (Virat Kohli), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, ऋषभ पंत, ईशान किशन, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा , शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com