Afghanistan Cricket Team X/ACBofficials
क्रीडा

World Cup 2023: अफगाणिस्तानने केला मोठा उलटफेर! गतविजेत्या इंग्लंडला चारली पराभवाची धूळ

England vs Afghanistan: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत अफगाणिस्तानने रविवारी मोठा उलटफेर करत इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला.

Pranali Kodre

Afghanistan won by runs against England in ICC ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी अफगाणिस्तान संघाने मोठा उलटफेर केला आहे. अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडला तब्बल 69 धावांनी पराभूत करत यंद्याच्या स्पर्धेतील पहिला विजय संपादन केला. मात्र, इंग्लंडचा या स्पर्धेतील दुसरा पराभव आहे.

दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडसमोर विजयासाठी 285 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 40.3 षटकात 215 धावांत सर्वबाद झाला.

अफगाणिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो आणि डेविड मलान यांनी सुरुवात केली होती. पण बेअरस्टो 2 धावांवरच बाद झाला. पाठोपाठ जो रुट 11 धावांवर बाद झाला. तसेच स्थिरावलेला मलानही 32 धावा करुन मोहम्मद नबीविरुद्ध खेळताना बाद झाला.

कर्णधार जोस बटलरबही फार काही करू शकला नाही. त्याला नवीन-उल-हकने 9 धावांवर बाद केले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 4 बाद 91 धावा अशी झाली होती. पण एक बाजू हॅरी ब्रुकने सांभाळली होती. त्याने समोरून विकेट्स जात असताना अर्धशतक झळकावले.

मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने भक्कम साथ मिळाली नाही. लियाम लिव्हिंगस्टोन (10), सॅम करन (10) आणि ख्रिस वोक्सही (9) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर ब्रुकचा अडथळाही मुजीबने दूर केला. ब्रुकने 61 चेंडूत 66 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर आदिल राशीदने 20 धावांवर बाद झाला, तर मार्क वूड 18 धावांवर बाद झाला. रिस टोपली 15 धावांवर नाबाद राहिला.

अफगाणिस्तानकडून मुजीब उर रेहमान आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच मोदम्मद नबीने 2 विकेट्स घेतल्या. तसेच फझलहक फारूकी आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाचा निर्णय घेतला होता. पण अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. रेहमनुल्लाह गुरबाजने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळण्यास सुरुवात केली. त्याला इब्राहिम झाद्रानने चांगली साथ दिली.या दोघांनी सलामीला 114 धावांची भागीदारी केली.

मात्र झाद्रानला आदिल राशिदने 28 धावांवर माघारी पाठवले. पाठोपाठ 19 व्या षटकात अफगाणिस्तानला दोन धक्के बसले. रेहमत शाह ३ धावांवर यष्टीचीत झाला, तर पुढच्याच चेंडूवर गुरबाज धावबाद झाला. गुरबाजने 57 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांसह 80 धावांची खेळी केली.

त्यानंतर अझमतुल्ला (19) आणि कर्णधार हश्मतुल्लाह शाहिदी (14) यांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण ते स्थिरावल्यानंतर बाद झाले. मात्र, इक्रम अलीखिलने 58 धावांची खेळी करत अफगाणिस्तानला मोठ्या धावसंख्येकडे नेले.

तसेच अखेरीस राशिद खानने 22 चेंडूत 23 आणि मुजीब उर रेहमानने 16 चेंडूत 28 धावा करत मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे अफगाणिस्तान संघ ४९.५ षटकात सर्वबाद होऊनही 284 धावांपर्यंत पोहचला.

आदिल राशिदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मार्क वूडने 2 विकेट्स घेतल्या. याबरोबरच रिस टोपली, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जो रुट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT