Aditi Ashok Wins Silver Asian Games 2023 Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games 2023: अदिती अशोकने रचला इतिहास, 'हा' मोठा रेकॉर्ड केला नावावर!

Aditi Ashok Wins Silver: 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी आदिती अशोकने भारताला पहिले पदक जिंकून दिले आहे.

Manish Jadhav

Aditi Ashok Wins Silver Asian Games 2023: हांगझोऊ येथे खेळल्या जात असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी आदिती अशोकने भारताला पहिले पदक जिंकून दिले आहे.

भारतीय गोल्फपटू अदिती अशोकला महिला गोल्फ स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आपली लय कायम ठेवता आली नाही. मात्र, तिने भारताला रौप्य पदक मिळवून दिले. यासह ती महिला गोल्फमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला गोल्फर ठरली आहे.

भारताचे गोल्फमधील चौथे वैयक्तिक पदक

या स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य दोन भारतीय महिला प्रणवी उर्स (13वे स्थान) आणि अवनी प्रशांत (संयुक्त 18वे स्थान) यांनीही शेवटच्या दिवशी निराशा केली. प्रणवीने 75 तर अवनीने 76 चे कार्ड खेळल्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेत चौथ्या स्थानावर घसरल्याने पदक हुकले.

अदितीचे सुवर्णपदक हुकले पण दोन वेळच्या या ऑलिम्पियनने तिच्या कामगिरीने प्रभावित केले. टोकियो ऑलिम्पिकमध्येही ती थोड्या फरकाने मागे राहून चौथ्या स्थानावर घसरली होती.

भारताचे (India) गोल्फमधील हे चौथे वैयक्तिक पदक ठरले. लक्ष्मण सिंग आणि शिव कपूर यांनी 1982 आणि 2002 हंगामात सुवर्णपदक जिंकले तर राजीव मेहता यांनी नवी दिल्ली (1982) मध्ये रौप्यपदक जिंकले.

लक्ष्मण, राजीव, ऋषी नारायण आणि अमित लुथरा यांच्या भारतीय संघाने 1982 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. 2006 आणि 2010 च्या मोसमात दोहा आणि ग्वांगझू येथे झालेल्या सांघिक स्पर्धेत भारताने रौप्य पदक जिंकले होते.

भारताने आतापर्यंत 40+ पदके जिंकली आहेत

चीनमधील (China) हांगझोऊ येथे खेळल्या जाणाऱ्या आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारताने आतापर्यंत 40+ पदके जिंकली आहेत. सातव्या दिवसापर्यंत भारताच्या खात्यात एकूण 38 पदके होती.

आज (रविवार) आठव्या दिवसाच्या सुरुवातीला, अदिती अशोकने महिलांच्या गोल्फमध्ये रौप्य आणि मनीषा कीर, राजेश्वरी कुमारी आणि प्रीती राजक यांनी महिला ट्रॅप सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकून भारताला 40 गुणांच्या पुढे नेले. भारतीय पुरुष ट्रॅप संघानेही सुवर्णपदक जिंकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT