Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli on Adipurush: 'आदिपुरुष' मधील डायलॉग ऐकून किंग कोहली भडकला? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओची सत्यता

Virat Kohli on Adipurush: साऊथ सुपरस्टार प्रभासच्या 'आदिपुरुष' चित्रपटावर टीकेचे बाण सोडले जात आहेत. चित्रपटातील डॉयलॉग अत्यंत बोगस असल्याचे बोलले जात आहे.

Manish Jadhav

Virat Kohli on Adipurush: साऊथ सुपरस्टार प्रभासच्या 'आदिपुरुष' चित्रपटावर टीकेचे बाण सोडले जात आहेत. चित्रपटातील डॉयलॉग अत्यंत बोगस असल्याचे बोलले जात आहे. आदिपुरुषवर सोशल मीडियावरुनही टीका होत आहे.

लोक आपला राग व्यक्त करत आहेत. प्रभासचा हा चित्रपट पाहून स्टार भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीही (Virat Kohli) रागाने लालबुंद झाला आहे. त्याला या चित्रपटातील डॉयलॉग आवडले नाहीत. डायलॉग ऐकून तो ही संतापला असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इतकेच नाही तर त्याच्या नावाच्या पोस्टही व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये आदिपुरुषच्या डॉयलॉगवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

दुसरीकडे, असेही बोलले जात आहे की, कोहलीने पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहिला होता. मात्र, त्याला हा चित्रपट अजिबात आवडला नाही. त्यानंतर त्याने ट्विट केले.

आदिपुरुषवर कोहलीचा रिव्ह्यू!

कोहलीच्या नावाने आदिपुरुषचा रिव्ह्यू व्हायरल होत आहे. चित्रपटासंदर्भात त्याच्या नावाने काय व्हायरल झाले आहे हे जाणून घेण्यासोबतच, व्हायरल पोस्टचे सत्य काय आहे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.

कारण अनेक व्हेरिफाईड अकाऊंट्सनी त्याच्या नावाने व्हायरल पोस्ट रिट्विट केली आहे. खरे तर, त्याने या चित्रपटाबाबत (Movie) कोणत्याही स्वरुवाचा रिव्ह्यू दिलेला नाही.

कोहलीच्या नावाने पोस्ट व्हायरल

कोहलीच्या नावाच्या ट्विटर अकाऊंटवर चित्रपटाचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यासोबतच संतापलेल्या इमोजीही शेअर करण्यात आल्या आहेत. अनेक यूजर्संनी ती कोहलीची पोस्ट आहे, असे समजून त्याच्या नावाने रिट्विट करण्यास सुरुवात केली.

कोहलीच्या नावाने व्हायरल होत असलेले ट्विट त्याचे मूळ अकाऊंट नाही. 6 जूनपासून त्याच्या व्हेरिफाईड अकाउंटवरुन एकही पोस्ट शेअर केलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT