Adam Gilchrist
Adam Gilchrist  Dainik Gomantak
क्रीडा

Richest Cricketer: विराट-धोनी नव्हे, 'हा' खेळाडू बनला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर; संपत्ती 3100 कोटींच्या पुढे

Manish Jadhav

Richest Cricketer In The World: क्रिकेट हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिडाप्रकारांपैकी एक आहे. क्रिकेटमध्ये प्रसिद्धीसोबतच पैसाही भरपूर आहे. चला तर मग जाणून घेऊया सध्याचा सर्वात श्रीमंत क्रिकेटर कोण आहे. पण, विशेष म्हणजे या यादीत विराट कोहली आणि एमएस धोनीच्या वरती 15 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूचे नाव आहे.

सीईओ वर्ल्ड मॅगझिननुसार, ऑस्ट्रेलियन विकेटकीपर-फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे. गिलख्रिस्टची संपत्ती विराट कोहली, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि एमएस धोनीपेक्षा जास्त आहे. त्याची एकूण संपत्ती 3130 कोटींच्या जवळपास आहे.

दरम्यान, क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनची एकूण संपत्ती 1400 कोटींच्या जवळपास आहे. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी जगातील तिसरा श्रीमंत क्रिकेटपटू आहे. एमएस धोनीची एकूण संपत्ती 949 कोटी रुपये आहे.

तसेच, या यादीत टीम इंडियाचा (Team India) धडाकेबाज फलंदाज विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीची एकूण संपत्ती 923 कोटी रुपये आहे. क्रिकेटशिवाय विराट कोहली जाहिरातींमधूनही भरपूर पैसे कमावतो.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. रिकी पाँटिंगची एकूण संपत्ती 617 कोटी रुपये आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT