Gautam Gambhir Abhishek Sharma Video Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: अभिषेक शर्माची 'गंभीर' शाळा! सलग फ्लॉप शो नंतर हेड कोच संतापला, बसमधील 'तो' व्हिडिओ झाला व्हायरल

Gautam Gambhir Abhishek Sharma Video: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाची वाटचाल सध्या खडतर होताना दिसत आहे.

Sameer Amunekar

चेन्नई: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाची वाटचाल सध्या खडतर होताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचे उपांत्य फेरीचे समीकरण बिघडले असतानाच, युवा सलामीवीर अभिषेक शर्माच्या खराब फॉर्मने चिंतेत भर घातली आहे. सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झाल्यानंतर आता अभिषेकला हेड कोच गौतम गंभीर यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याची चर्चा रंगली आहे. चेन्नईत दाखल झाल्यानंतर टीम बसमध्ये गंभीर अभिषेकची 'क्लास' घेतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

अभिषेकला मोलाचा सल्ला

गेल्या काही काळापासून आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा अभिषेक शर्मा विश्वचषकाच्या मोठ्या मंचावर सपशेल अपयशी ठरला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या निर्णायक सामन्यासाठी भारतीय संघ चेन्नईत पोहोचला आहे.

विमानतळावरून हॉटेलकडे जात असताना टीम बसमध्ये गौतम गंभीर आणि अभिषेक शर्मा यांच्यात अत्यंत गंभीर चर्चा झाली. व्हायरल व्हिडिओमध्ये गंभीर अभिषेकला फलंदाजीतील तांत्रिक चुका किंवा मानसिकतेबाबत कडक शब्दांत समज देताना दिसत आहेत. या चर्चेत सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोएशे देखील सहभागी होते. गंभीर यांचा स्वभाव पाहता, ते अभिषेकला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देत असल्याचे स्पष्ट होत आहे.

शून्याचा 'नकोसा' विक्रम

अभिषेक शर्मासाठी हा विश्वचषक आतापर्यंत एखाद्या स्वप्नवत नसून भयानक स्वप्नासारखा ठरला आहे. अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो नामीबियाविरुद्ध खेळू शकला नाही. मात्र, १५ फेब्रुवारीला पाकिस्तानसारख्या हाय-व्होल्टेज सामन्यात पुनरागमन करूनही त्याच्या पदरी 'शून्य'च पडले.

नेदरलँड्सविरुद्धही तो खाते उघडू शकला नाही. सलग तीन वेळा 'डक'वर बाद झाल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने १५ धावा केल्या खऱ्या, पण चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात तो अपयशी ठरला. यामुळेच आता प्रशिक्षकांनी त्याच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.

झिम्बाब्वेविरुद्धचा सामना ठरणार 'अग्निपरीक्षा'

भारताचा पुढील सामना २६ फेब्रुवारी रोजी चेन्नईत झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. टीम इंडियाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. अभिषेक शर्मासाठी हा सामना त्याचे संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी 'करो या मरो' असा असेल.

गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनानंतर अभिषेक आपल्या नैसर्गिक शैलीत परतणार का आणि चेन्नईच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पाडणार का, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अनुभवी प्रशिक्षकाची ही 'क्लास' अभिषेकचे नशीब बदलणार का, हे गुरुवारी स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government: नारी शक्ती ते गरीब कल्याण! मुख्यमंत्री सावंतांनी मांडली भाजप सरकारच्या कारभाराची 4 प्रमुख सूत्रे; 12 वर्षांच्या विकासाचे भव्य प्रदर्शन

Konkan Railway: गर्दीचा खेळ खल्लास, प्रवास होणार सुपरफास्ट! कोकण रेल्वेचा 4,704 कोटींचा 'मास्टर प्लॅन'; गोव्यातील रेल्वे सुविधांवर विशेष भर

Viral Video: "स्वतः मरणार नाहीत, पण दुसऱ्याचा जीव घेतील!", खतरनाक व्हिडिओ बघून सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर; स्टंटबाज बाबाचा अजब कारनामा व्हायरल

भारताने रचला नवा इतिहास! संरक्षण उत्पादनाने गाठला 1.78 लाख कोटींचा सर्वकालिक उच्चांक; स्वदेशी लष्करी ताकदीचा जागतिक डंका

NCERT Dancing Girl Controversy: इतिहासाशी छेडछाड! 4500 वर्षांपूर्वीच्या 'डान्सिंग गर्ल' मूर्तीला कपडे घालण्याचा एनसीईआरटीचा अजब पराक्रम; पुरातत्त्वशास्त्राची ऐशीतैशी

SCROLL FOR NEXT