Abhimanyu Easwaran
Abhimanyu Easwaran Dainik Gomantak
क्रीडा

Ranji Trophy: नया है यह! स्वत:च्याच नावाच्या स्टेडियमवर खेळतोय बंगालचा ओपनर, वडिलांनी केलाय खर्च

Pranali Kodre

Abhimanyu Easwaran: क्रिकेटमध्ये आजपर्यंत अनेक स्टेडियममधील स्टँड्सला किंवा गेटला क्रिकेटपटूंची नावे देण्यात आली आहेत. काही क्रिकेटपटूंची नावे स्टेडियमलाही देण्यात आली आहेत. पण, या खेळाडूंना त्यांची नावे दिल्यानंतर त्याच स्टेडियममध्ये खेळण्याची संधी क्वचितच मिळाली असेल. मात्र, भारताचा फलंदाज अभिमन्यू ईश्वरनच्या बाबतीत एक अनोखा योगायोग घडणार आहे. तो त्याच्याच नावाच्या स्टेडियममध्ये खेळत आहे.

विशेष गोष्ट अशी की त्याच्या वडिलांनीच बनवलेल्या स्टेडियममध्ये तो खेळत आहे. मंगळवारपासून रणजी ट्रॉफीमध्ये बंगाल विरुद्ध उत्तराखंड सामना सुरू झाला. हा सामना डेहराडूनमधील अभिमन्यू क्रिकेट ऍकेडमी स्टेडियमवर होत आहे. याच ऍकेडमीमध्ये बंगालचा सलामीवीर असलेल्या अभिमन्यू ईश्वरनने ट्रेनिंगही घेतले आहे.

मुळचे तमिळनाडूचे असणारे ईश्वरन कुटुंब सत्तरच्या दशकादरम्यानच उत्तराखंडला स्थायिक झाले होते. पण अभिमन्यू लहान असताना बंगालमध्ये चांगल्या क्रिकेट सुविधांच्या कारणाने त्याला त्याच्या वडिलांनी बंगालला आणले. तेव्हापासून अभिमन्यू बंगालकडून खेळतो. पण त्याने सराव डेहराडूनमध्येच केला आहे.

दरम्यान, खेळाप्रती असलेल्या प्रेमामुळे अभिमन्यूचे वडील रंगनाथन परमेश्वरन ईश्वरन यांनी 2005 मध्ये डेहराडूनमध्ये एक जागा खरेदी केली. याच जागेवर त्यांनी अभिमन्यू क्रिकेट ऍकेडमी स्टेडियम उभे केले.

पेशाने चार्टर्ड अकाउंट असणाऱ्या रंगनाथन परमेश्वरन ईश्वरन यांनी अभिमन्यूच्या जन्मापूर्वीच 1988 साली अभिमन्यू क्रिकेट ऍकेडमी सुरू केली होती. त्यांनी सीएच्या शिक्षणादरम्यान वृत्तपत्र विकण्याचे काम केले होते. पण नंतर हळुहळू परिस्थिती सुधारत गेल्याने त्यांनी जागा घेत तिथे स्टेडियम उभे केले.

याबद्दल सामन्यापूर्वी अभिमन्यू म्हणाला, 'मी याच मैदानावर क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. इथे खेळणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या वडिलांची जिद्द आणि मेहनतीमुळे या स्टेडियमचे निर्माण झाले. जेव्हा तुम्ही घरी येता, तेव्हा तुम्हाला छान वाटते. पण तरी माझे लक्ष माझ्या संघाला विजय मिळवून देण्याकडेच असेल.'

'फक्त मुलासाठी स्टेडियम बनवले नाही'

अभिमन्यू क्रिकेट ऍकेडमी स्टेडियमवर पहिल्यांदाच प्रथम श्रेणी सामना खेळवण्यात येत आहे. याबद्दल अभिमन्यूचे वडिलांनीही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की 'मला छान वाटत आहे. पण माझ्यासाठी यश तेव्हा असेल, जेव्हा माझा मुलगा भारतासाठी 100 कसोटी सामने खेळू शकले.'

'मी हे क्रिकेट मैदान फक्त माझ्या मुलासाठी बनवलेले नाही, तर क्रिकेटप्रती असलेल्या माझ्या जिद्दीला पूर्ण करण्यासाठी बनवले होते. त्याचे निर्माण मी 2006 साली केले होते. तेव्हापासून मी हे स्टेडियम सातत्याने विकसित करण्यासाठी खर्च करत आहे. मला यातून काही आर्थिक फायदा नाही, पण माझी आवड जपली जात आहे.'

अभिमन्यू क्रिकेट ऍकेडमीचा फायदा केवळ अभिमन्यूलाच झाला असे नाही, तर या ऍकेडमीतील 5 खेळाडू सध्या उत्तराखंड संघाकडून खेळत आहेत.

अभिमन्यू दमदार फॉर्ममध्ये

अभिमन्यू बंगाल संघातील महत्त्वाचा खेळाडू तर आहेच, पण तो सध्या सातत्याने भारतीय संघाचेही दरवाजे ठोठावत आहे. तो भारतीय अ संघाचाही सध्या नियमित सदस्य आहे. त्याने नुकत्याच बांगलादेश दौऱ्यात भारतीय अ संघाचे चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेत नेतृत्वही केले होते. तसेच त्याने या मालिकेतील दोन्ही सामन्यांत शतकी खेळी केल्या होत्या.

त्याच्या सातत्याने चांगल्या कामगिरीमुळे त्याला बांगलादेश दौऱ्यात भारताच्या वरिष्ठ संघात दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या ऐवजी कसोटी मालिकेसाठी संधीही मिळाली होती. मात्र, त्याला अंतिम 11 जणांच्या संघात खेळवण्यात आले नाही.

सध्या तो बंगालकडून रणजी ट्रॉफी खेळण्यात व्यस्त आहे. त्याने आत्तापर्यंत 79 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 19 शतके आणि 23 अर्धशतकांसह 5746 धावा केल्या आहेत. याबरोबरच त्याने 78 लिस्ट ए सामन्यात 7 शतके आणि 21 अर्धशतकांसह 3376 केल्या आहेत. त्याने 27 टी20 सामनेही खेळले असून 728 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem Temple Theft: गोव्यातील मंदिरे असुरक्षित! सांगेत विठ्ठल मंदिरातील 5 किलो चांदीची 4 लाखांची प्रभावळ लंपास

Afghanistan Floods: अफगाणिस्तानात विनाशकारी पुरात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू; बागलान प्रांताला सर्वाधिक फटका!

मसाल्यातील केमिकल वादावर बोर्डाचे मोठे पाऊल; निर्यातदारांसाठी नवीन गाइडलाइन जारी

Goa News: पल्‍लवी धेंपे आणि अँथनी बार्बोझा यांची बदनामी; संशयिताला प्रतिबंधात्‍मक अटक

POK मध्ये पाकिस्तान सरकारविरोधात ‘काश्मीरी जनता’ रस्त्यावर, पाक रेंजर्सची दडपशाही; व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT