IND vs BAN: टीम इंडियात रोहितची जागा घेणार बंगालचा सलामीवीर? बांगलादेशविरुद्ध ठोकलीत सलग 2 शतकं

दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागेवर बंगालच्या सलामीवीराची निवड भारतीय संघात होऊ शकते.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

IND vs BAN: बांगलादेश दौऱ्यावर असलेला भारतीय संघ वनडे मालिकेनंतर यजमानांविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दरम्यान, भारतीय संघाला त्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्ध दुसरा वनडे सामना खेळताना दुखापतग्रस्त झाला आहे.

त्यामुळे रोहित 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या वनडे सामन्याबरोबरच 14 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेलाही मुकण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे आता त्याच्या जागेवर बदली खेळाडू म्हणून अभिमन्यू ईश्वरनची निवड होऊ शकते.

(Abhimanyu Easwaran can replace Rohit Sharma for Test Series against Bangladesh)

Rohit Sharma
IND vs BAN: फिफ्टी ठोकलेल्या 'हिटमॅन' ला चाहत्यांचा प्रश्न, 'पहले क्यों नहीं आए..'

रोहितचा अंगठा जखमी

बुधवारी ढाकामध्ये झालेल्या दुसरा वनडे सामन्यात स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला चेंडू लागला. त्यामुळे त्याच्या अंगठ्याजवळून रक्तही येत होते. त्यामुळे त्याचे स्कॅनही करावे लागले. तसेच तो दुसऱ्या सामन्यात फलंदाजीसाठीही भारतीय संघाची गरज ओळखून 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता.

पण, जरी त्याने फलंदाजी केली असली, तरी त्याच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली असण्याची शक्यता आहे. कारण, सामन्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले आहे की रोहित तिसऱ्या वनडेत खेळणार नाही. तो मुंबईत परतणार असून दुखापतीवर उपचारासाठी वैद्यकिय तज्ञांना भेटेल.

त्यामुळे आता त्यानंतरच तो बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत खेळणार की नाही स्पष्ट होईल.

अभिमन्यू ईश्वरनचा तुफान फॉर्म

दरम्यान, जर रोहित वेळेत तंदुरुस्त झाला नाही, तर अभिमन्यू ईश्वरनचा चांगला पर्याय समोर असेल. सध्या ईश्वरन बांगलादेशमध्येच असून बांगलादेश अ संघाविरुद्ध चार दिवसीय कसोटी सामना खेळण्यात व्यस्त आहे. तसेच तो भारतीय अ संघाचा कर्णधारही आहे.

त्याने बांगलादेश अ संघाविरुद्ध खेळताना दरदार फॉर्म दाखवला आहे. त्याने पहिल्या चार दिवसीय सामन्यात 255 चेंडूत 141 धावांची खेळी केली होती. तसेच दुसऱ्या चार दिवसीय सामन्यातही त्याने 248 चेंडूत 157 धावांची खेळी केली आहे. त्याचा हा फॉर्म पाहाता आणि तो बांगलादेशमध्ये असल्याने भारतीय निवड समीती गरज पडल्यास रोहित शर्माच्या जागेवर त्याचा विचार करू शकतात.

तसेच मोहम्मद शमीच्या कसोटी मालिकेत खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे. तो देखील दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे जर तो देखील या मालिकेतून बाहेर पडला, तर त्याच्या जागेवर उमरान मलिक किंवा भारत अ संघातील मुकेश कुमारला संधी दिली जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com