Babar Azam Hat Viral Video Dainik Gomantak
क्रीडा

Viral Video: "माझ्याकडेच एक आहे, मी देऊ शकत नाही" पाकिस्तानी चाहतीची मागणी Babar Azam ने फेटाळली

Babar Azam Viral Video: वास्तविक, सराव सत्रानंतर, एक हृदयस्पर्शी क्षण आला जेव्हा माजी कर्णधार बाबर आझमने स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांशी संवाद साधला.

Ashutosh Masgaunde

A female fan asked Babar Azam for his hat, but the star batsman dismissed her request saying, "I also have only one hat and can't give it to you":

मेलबर्न येथे 26 डिसेंबर रोजी पाकिस्तानचा दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. मालिकेतील पहिला सामना 360 धावांनी गमावल्यानंतर शान मसूदच्या नेतृत्वाखालील संघ विजयाच्या आशेने मैदानात उतरेल.

पाकिस्तानचे खेळाडू सामन्याच्या काही दिवस अगोदर मैदानावर पोहोचले असून, ते तयारीत व्यस्त आहेत. पाकिस्तान संघाच्या सराव सत्रादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वास्तविक, सराव सत्रानंतर, एक हृदयस्पर्शी क्षण आला जेव्हा माजी कर्णधार बाबर आझमने स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांशी संवाद साधला.

या दरम्यान एका महिला चाहत्याने बाबरला स्वाक्षरी करत असताना त्याची हॅट मागितली, परंतु स्टार फलंदाजाने तिची विनंती धुडकावून लावली आणि म्हणाला, माझ्याकडेही फक्त एकच हॅट आहे आणि ती तुला देऊ शकत नाही.

दुसरीकडे, या मालिकेतील पहिल्या सामन्यातील बाबर आझमच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, तर पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत तो फलंदाजीत काही खास करू शकला नाही.

सामन्याच्या पहिल्या डावात त्याला 54 चेंडूत केवळ 21 धावा करता आल्या होत्या तर दुसऱ्या डावात त्याला 37 चेंडूत केवळ 14 धावा करता आल्या होत्या.

आता 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बाबर आझम कशी कामगिरी करतो हे पाहण्यासारखे असेल.

बाबरच्या खराब फॉर्ममुळे पाकिस्तानची चिंता आणखी वाढली आहे. बाबरने आतापर्यंत 50 कसोटी सामन्यांमध्ये 47 च्या सरासरीने 3807 धावा करत पाकिस्तानच्या फलंदाजीला एका प्रकारे भक्कम आधार दिला आहे. मात्र, 2023 हे वर्ष त्याच्यासाठी आव्हानात्मक राहिले आहे, ज्यामध्ये त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे.

25 सामन्यांमध्ये 1065 धावांसह त्याचा एकदिवसीय फॉर्म यावर्षी दमदार आहे, परंतु कसोटीत त्याच्या अगदी विरुद्ध आहे, जिथे त्याची सरासरी फक्त 23 आहे.

या वर्षात पाकिस्तानचा इंग्लंडकडून 3-0 असा पराभव आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका अनिर्णित राहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fianance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

Mayem Fire Incident: वायंगिणी-मयेत आगीचा तांडव! 30 लाख रुपयांचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Cash For Job: आमच्यावर पोलिसांमार्फत पाळत! सरदेसाई, पालेकरांचा सनसनाटी आरोप

Rashi Bhavishya 25 November 2024: उद्योजकांसाठी आजचा दिवस खास, मिळणार मोठी डील... तुमच्या राशीत दडलंय काय?

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

SCROLL FOR NEXT