India Under-19 World Cup Squad: दक्षिण आफ्रिकेत पुढील वर्षी अंडर-19 विश्वचषक होणार आहे. याआधी भारतीय संघ तिरंगी मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ही माहिती दिली आहे. मंडळाने आपले वेळापत्रक आणि भारतीय संघही जाहीर केला. ही तिरंगी मालिका जोहान्सबर्ग येथे खेळवली जाणार आहे, ज्यामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान दोनदा एकमेकांशी भिडणार आहेत. भारताचा अंडर-19 संघ 29 डिसेंबरला आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.
दरम्यान, भारताचा अंडर-19 संघ या तिरंगी मालिकेतील पहिला सामना 29 डिसेंबर रोजी अफगाणिस्तानच्या अंडर-19 संघाबरोबर खेळेल आणि त्यानंतर 2 जानेवारीला दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-19 संघाशी सामना होईल. त्याचवेळी, तिसरा सामना 4 जानेवारीला अफगाणिस्तानविरुद्ध तर 6 जानेवारीला दक्षिण आफ्रिकेशी सामना होणार आहे. या मालिकेचा अंतिम सामना 10 जानेवारीला होणार आहे. बीसीसीआयने तीन राखीव खेळाडू आणि चार बॅकअप खेळाडूंसह 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
दुसरीकडे, 19 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेतील ब्लूमफॉन्टेन येथे अंडर-19 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. भारताला बांगलादेश, आयर्लंड आणि अमेरिकेसह A गटात स्थान देण्यात आले आहे. संघ 20 जानेवारीला बांगलादेशविरुद्ध मोहिमेने सुरुवात करेल. उदय सहारन याच्याकडे विश्वचषक आणि तिरंगी मालिका या दोन्ही सामन्यांमध्ये संघाची कमान सोपवण्यात आली आहे.
अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अविनाश राव (यष्टीरक्षक), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर), धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.
तिरंगी मालिकेसाठी स्टँडबाय खेळाडू: प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमन.
बॅकअप खेळाडू: दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विघ्नेश, किरण चोरमले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.