India vs Australia, 3rd ODI Dainik Gomantak
क्रीडा

Viral Video: चालू सामन्यात अचानक घुसलेल्या कुत्र्यानं ग्राऊंड स्टाफसह जड्डूला पळवलं, रोहितलाही आवरेना हसू

India vs Australia 3rd ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चेन्नईत होत असलेल्या वनडे सामन्यादरम्यान अचानक एका कुत्र्यानं मैदानात एन्ट्री केली होती.

Pranali Kodre

India vs Australia, 3rd ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वनडे मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (22 मार्च) खेळवला जात आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात एक दुर्मिळ गोष्ट पाहायला मिळाली.

अनेकदा क्रिकेट सामने नैसर्गिक अडथळ्यांमुळे म्हणजेच पाऊस, प्रकाश अशा गोष्टींमुळे थांबल्याचे पाहिले जाते, पण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात एका कुत्र्यामुळे अडथळा आला होता.

झाले असे की या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्यावेळी 43 व्या षटकाच्या दरम्यान एक कुत्रा मैदानात आला. त्यावेळी त्याला पकडण्यासाठी ग्राऊंड स्टाफही त्याच्या मागे मैदानात पळत होते. रविंद्र जडेजानेही या कुत्र्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माला हसू आवरता आले नाही.

अखेर तो कुत्रा जिथून आला होता, तिथूनच बाहेर पडला. पण घटनेमुळे काही काळासाठी हा सामना थांबला होता. अखेर तो कुत्रा बाहेर गेल्यानंतर पुन्हा सामना पुन्हा सुरू झाला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड यांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी 68 धावांची सलामी भागीदारी केली. पण नंतर 11 ते 15 षटकांदरम्यान हार्दिक पंड्याने शानदार गोलंदाजी करताना हेडला 33 धावांवर, मार्शला 47 धावांवर आणि स्टीव्ह स्मिथला शुन्यावर बाद करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवर अंकुश लावला.

यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. मात्र प्रत्येक खेळाडू छोटेखानी खेळी करून बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ 49 षटकात सर्वबाद 269 धावाच करू शकला.

भारताकडून हार्दिकने 3 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवनेही 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्मग सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

निर्णायक सामना

चेन्नईत होत असलेला हा सामना निर्णयक सामना आहे. कारण भारताने या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकला होता, तर ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना जिंकला होता.

त्यामुळे या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांनंतर 1-1 अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे चेन्नईत होणारा तिसरा सामना निर्णायक सामना आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ मालिकाही जिंकणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "तुम्ही भाजपची B-Team, आम्हीच तुम्हाला नाकारतो", काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत; गोवा निवडणुकीत काँग्रेस 'एकला चलो रे'

Diwali 2025: पणत्या बनवण्याचा वारसा मावळतोय! डिचोलीतील व्यवसाय अंधाराखाली; राज्याबाहेरील पणत्यांची चलती

Goa Police App: गोवा पोलिस आता ‘स्‍मार्ट’ मोबाईलवर! सूचना, सायबर सुरक्षिततेसंबंधी माहिती मिळणार तात्काळ

Panaji: कारमध्ये कोंडले, लाथाबुक्यांनी केली मारहाण; तक्रारदाराची साक्ष देण्यास नकार; खंडणी प्रकरणातील 6 आरोपी निर्दोष

Goa Live News: फर्मागुडी येथील जीव्हीएम सर्कल जवळ कार व स्कुटर यांच्यात अपघात

SCROLL FOR NEXT