Kerala man playing freestyle football in lungi Video Screenshot
क्रीडा

Video: 64 वर्षांचे ट्रकचालक आजोबा लूंगी नेसून खेळतायेत फ्री स्टाईल फुटबॉल

केरळमधील एका फुटबॉल खेळणाऱ्या 64 वर्षांच्या आजोबांच्या व्हायरल व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

वय ही गोष्ट केवळ फक्त आकडा आहे, अशी गोष्ट आपल्याला अनेकदा ऐकायला मिळते. त्यामुळे कोणत्याही वयाची व्यक्ती कोणतीही गोष्ट करु शकतात असे म्हटले जाते. म्हणजे कधी 15-16 वर्षांचा मुलगा गुगलमध्ये जॉबला लागतो तर कधी 80 वर्षांचे आजोबा दहावीची परीक्षा पास होतात, अशी अनेक उदाहरण आपल्याला बघायला मिळतील. असंच एक उदाहरण केरळमधील एका फुटबॉल खेळणाऱ्या 64 वर्षांच्या आजोबांच्या व्हायरल व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर धुमाकूळ घालतं आहे. (Kerala man playing freestyle football in lungi)

प्रदिप नावाच्या युजरने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, मला या 64 वर्ष आजोबांना भेटण्याची संधी मिळाली. जे अजूनही फुटबॉल खेळतात. ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ट्रक चालवतात, पण लॉरीमध्ये सोबत त्यांचे फुटबॉल किट देखील ठेवतात. ते कधी काळी वायनाड फुटबॉल टीमसाठी (Wayanad Football Team) खेळलेले खेळाडू आहेत, आणि कदाचित ते एकमेव आहेत, जे अजूनही फुटबॉल खेळतात. आपल्याला कोणती गोष्ट आवडतं असेल तर ती फक्त करत राहा, ही गोष्ट मी या आजोबांकडून शिकलो आहे. आणि हो, ते एक गाणं आहे ना, एक दिन हम इस दुनिया को छोड़ कर चले जाएंगे, इसलिए जिंदगी ऐसे जीएं जिसे आप याद रखना चाहें।, असेही प्रदिपने लिहीले आहे.

या व्हिडोओमध्ये आपण बघू शकतो की, टीशर्ट, पॅन्ट आणि शुज घातलेला एक तरुण फुटबॉल खेळाडू या आजोबांच्या समोर फुटबॉलच्या कसरती करत आहे. तर ते आजोबा केवळ शर्ट आणि लुंगीवर आहेत. त्यांच्या पायात चप्पल देखील नाही. पण तो तरुण जेव्हा त्यांच्याकडे फुटबॉल पास करतो तेव्हा त्यांचे फुटबॉल स्किल्स बघून सर्वच जण आश्चर्यचकीत होतात. आजोबा पायाच्या सहाय्याने फुटबॉल आपल्या मानेवर घेतात, आणि नंतर डोक्यावर घेतात, आणि बराच वेळ ते तिथेच खेळवतात, त्यांचे हेच स्किल पाहून सर्वजण आश्चर्यचकीत होतात.

इन्टाग्रमवर ठरला हिट....

प्रदिपने इन्स्टाग्रमवर अपलोड केलेला हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 50 लाखांहून अधिक व्हूज मिळाले आहेत. तर 8 लाखांपर्यंत लाईक्स देखील मिळाले आहेत. यावर इतर युजर्सने लिहीले आहे की, तुम्ही केरळचे आहात, हे नाव न सांगता सांगणारा हा व्हिडीओ आहे. तर आणखी एका युजरने लिहीले आहे की, अनेक वृद्धांकडे असे टॅलेंट आहे, मात्र केवळ तरुण त्यांना काही तरी म्हणतील या भीतीने ते आपलं टॅलेंट दाखवत नाहीत. शेकडो युजर्सनी या आजोबांना लिजंड देखील म्हटलं आहे. एकूणचं काय तर आजोबांनी आपल्या स्किलने सर्वांचे मन जिंकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT