ENG vs NED: IPL फॉर्म कायम, पाकनंतर नेदरलँडवर जोस बटलरचा कहर, 21 चेंडूत 112 धावा

जोस बटलरच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली.
Jos Buttler
Jos ButtlerTwitter

जोस बटलरने (Jos Buttler) शुक्रवार, 17 जून रोजी एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या (England) फलंदाजाने दुसरे सर्वात वेगवान शतक केले. उजव्या हाताच्या फलंदाजाने काल अॅमस्टेलवीन येथील व्हीआरए ग्राउंडवर इंग्लंडच्या नेदरलँड्सविरुद्धच्या (netherland) पहिल्या एकदिवसीय सामन्यात केवळ 47 चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला.

नेदरलँड्सने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर जेसन रॉयच्या रूपाने लवकर विकेट घेण्यात यश मिळविले. वेगवान गोलंदाज शेन स्नेटरने डच संघाची पहिली विकेट घेतली. यानंतर फिल सॉल्ट आणि डेव्हिड मलान यांनी दुसऱ्या विकेटसाठी इंग्लंडला 22 धावांपर्यंत नेले.

Jos Buttler
डेल स्टेन बनला ऋतुराज गायकवाडचा जबरा फॅन, 'दोनच वर्षात बदलला खेळ'

डावाच्या 30व्या षटकात बटलर फलंदाजीला आला आणि त्याने येताच दमदार खेळी खेळायला सुरुवात केली. या दिग्गज खेळाडूने 27 चेंडूत अर्धशतक झळकावले. बटलर पूर्ण फॉर्ममध्ये दिसला आणि वेगवान शतक झळकावण्याच्या मार्गावर होता. सर्वात वेगवान शतकाचा विक्रम खुद्द बटलरच्या नावावर 46 चेंडूत आहे. त्याने 2015 साली दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते.

Jos Buttler
इंग्लंडने रचला इतिहास, वनडे क्रिकेटमध्ये उभारली सर्वात मोठी धावसंख्या

या इंग्लिश फलंदाजाचा सर्वात वेगवान तीन शतकांचा विक्रम बटलरच्या (Buttler Record) नावावर आहे. शतक झळकावल्यानंतर बटलरला कोणीही रोखू शकले नाही. आयपीएलच्या 2022 आवृत्तीत ऑरेंज कॅप जिंकल्यानंतर या खेळाडूसाठी ही पहिलीच स्पर्धा आहे. आयपीएलच्या 15व्या हंगामात बटलरने राजस्थान रॉयल्ससाठी (Rajastha Royals) चार शतके झळकावली होती. या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स (RR) उपविजेते ठरले. बटलरने आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या सर्वाधिक शतकांच्या विक्रमाचीही बरोबरी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com