पणजी: गोवा बुद्धिबळ संघटनेच्या (Goa Chess Association) आगामी निवडणुकीसाठी (Election) महत्त्वाच्या सचिवपदासाठी चौघांनी अर्ज आहेत. मंगळवारी या पदासाठी काणकोणचे शरेंद्र नाईक यांनी अर्ज सादर केला. आतापर्यंत कार्यकारी समितीच्या 12 जागांसाठी 17 जणांकडून 28 अर्ज सादर झाले आहेत. (28 Application for upcoming elections of Goa Chess Association)
बुद्धिबळ संघटनेची निवडणूक येत्या 22 ऑगस्ट रोजी नियोजित आहे. उमेदवारी अर्ज गुरुवारपर्यंत स्वीकारले जातील. मंगळवारी तिघा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात शरेंद्र नाईक यांनी सचिव, दक्षिण गोवा उपाध्यक्ष व दक्षिण गोवा संयुक्त सचिवपदासाठी, सांगे तालुका संघटनेचे किशोर देसाई यांनी उपाध्यक्ष व संयुक्त सचिवपदासाठी, तर धारबांदोडा संघटनेचे अनिल गावकर यांनी संयुक्त सचिवपदासाठी अर्ज सादर केला.
आतापर्यंत अध्यक्षपदासाठी चार अर्ज आहेत. राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्यासह विश्वास पिळर्णकर, महेश कांदोळकर व आशेष केणी यांनीही या पदासाठी अर्ज दाखल केला आहे. सचिवपदासाठी शरेंद्र यांच्या व्यतिरिक्त पिळर्णकर, कांदोळकर व केणी यांचेही अर्ज आहेत.
खजिनदारपदासाठी तीन, संयुक्त खजिनदारपदासाठी एक, उपाध्यक्षपदाच्या दक्षिण विभागासाठी सहा, उत्तर विभागासाठी दोन, संयुक्त सचिवपदासाठी दक्षिणेतून सहा, तर उत्तरेतून दोन उमेदवारी अर्ज आहेत. येत्या दोन दिवसांत आणखी काही अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. संघटनेच्या निवडणूक वेळापत्रकानुसार, गुरुवारी संध्याकाळी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. पाच ते दहा ऑगस्ट या कालावधीत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.