Goa: खासदार तेंडुलकर बुद्धिबळ अध्यक्षपदाच्या शर्यतीत

पार्श्वभूमीवर धारबांदोडा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष असलेले खासदार तेंडुलकर यांनी सोमवारी अर्ज भरून चुरस वाढविली
विनय तेंडुलकर
विनय तेंडुलकरDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर (Vinay Tendulkar) यांनी गोवा बुद्धिबळ संघटनेच्या (Goa Chess Association) प्रशासनात पुनरागमनाची तयारी केली आहे. सोमवारी त्यांनी संघटनेच्या आगामी कार्यकारी समिती अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. ते यापूर्वी 2013 ते 2017 या कालावधीत संघटनेचे अध्यक्ष होते. (Vinay Tendulkar has filed an application for the post of President of Goa Chess Association)

वीजमंत्री नीलेश काब्राल 2017-2021 या चार वर्षांसाठी अध्यक्षपदी राहिले, पण त्यांनी आता आणखी एका मुदतीसाठी अजूनही अर्ज भरलेला नाही. त्यामुळे त्यांची भूमिका अस्पष्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर धारबांदोडा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष असलेले खासदार तेंडुलकर यांनी सोमवारी अर्ज भरून चुरस वाढविली. यापूर्वी अध्यक्षपदासाठी बार्देशचे विश्वास पिळर्णकर, तिसवाडीचे महेश कांदोळकर, तसेच सासष्टीचे आशेष केणी यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज सादर केला आहे. निवडणुकीसाठी गुरुवारपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. निवडणूक 22 ऑगस्ट रोजी नियोजित आहे.

विनय तेंडुलकर
दाय ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत एबीसी हरमल संघ विजेता

बुद्धिबळ निवडणुकीत सोमवारी आणखी दोघांनी अर्ज सादर केले. मावळते सचिव किशोर बांदेकर यांनी दक्षिण गोवा उपाध्यक्षपदासाठी अर्ज केला आहे. ते मुरगाव तालुका बुद्धिबळ संघटनेचेही अध्यक्ष आहेत. दक्षिण गोव्यातून उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी यापूर्वी फोंड्याचे सागर साकोर्डेकर व सासष्टीचे दामोदर जांबावलीकर यांचे अर्ज आहेत. केपे तालुका बुद्धिबळ संघटनेचे समीर नाईक यांनी दक्षिण गोव्यातील उपाध्यक्ष व संयुक्त सचिवपदासाठी सोमवारी अर्ज सादर केला. दक्षिण गोव्यातून फोंड्याचे अमोघ नमशीकर व सासष्टीचे जांबावलीकर यांनीही संयुक्त सचिवपदासाठी अर्ज सादर केला आहे.

विनय तेंडुलकर
Tokyo Olympics: भारतीय हॉकी टीम फायनलमधून बाहेर,पेनल्टी स्ट्रोकेने केला घात

दृष्टिक्षेपात बुद्धिबळ निवडणूक

  • - आतापर्यंत 11 जागांसाठी 14 जणांचे अर्ज

  • - एकूण 22 अर्ज रिंगणात

  • - एका अध्यक्षपदासाठी 4 जण रिंगणात

  • - दक्षिण गोव्यातील 2 उपाध्यक्षपदासाठी 4 अर्ज

  • - दक्षिण गोव्यातील 2 संयुक्त सचिवपदासाठी 3 अर्ज

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com