West Indies Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023 पूर्वीच वेस्ट इंडिजला मोठा धक्का, आयर्लंडला पुढे जाण्याची संधी

World Cup 2023: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिज संघाला दंड भरावा लागला आहे.

दैनिक गोमन्तक

World Cup 2023: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिज संघाला दंड भरावा लागला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे कॅरेबियन संघावर हा दंड ठोठावण्यात आला आहे. वेस्ट इंडिजला त्यांच्या स्लो ओव्हर रेटमुळे मॅच फीच्या 40 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. इतकेच नाही तर वेस्ट इंडिजच्या खात्यातून दोन सुपर लीग गुणही कापले गेले आहेत. यामुळे संघाच्या 2023 च्या विश्वचषक पात्रता आशांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) वनडे मालिका सुरु होण्यापूर्वी वेस्ट इंडिजचा संघ वर्ल्ड सुपर लीग टेबलमध्ये 80 गुणांसह सातव्या स्थानावर होता. न्यूझीलंडविरुद्धची मालिका 1-2 ने गमावल्यानंतर, संघाचे 90 गुण झाले होते, परंतु स्लो ओव्हर रेटमुळे त्याचे आता केवळ 88 गुण झाले आहेत. त्यांचा नेट रन रेट देखील -0.738 आहे. वर्ल्ड कप सुपर लीग टेबलमध्ये वेस्ट इंडिजचा (West Indies) संघ अजूनही सातव्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड सुपर लीग टेबलमधील अव्वल आठ संघ भारतात (India) 2023 च्या विश्वचषकासाठी थेट पात्र ठरतील. त्यात यजमान भारतही आहे.

दुसरीकडे, सध्या वर्ल्ड सुपर लीग टेबलमध्ये इंग्लंड पहिल्या, बांगलादेश दुसऱ्या, पाकिस्तान तिसऱ्या, न्यूझीलंड चौथ्या, यजमान भारत पाचव्या, अफगाणिस्तान सहाव्या, वेस्ट इंडिज सातव्या आणि ऑस्ट्रेलिया (Australia) आठव्या क्रमांकावर आहे.

तसेच, वेस्ट इंडिजची हीच अवस्था राहिली तर आयर्लंडचा संघ त्यांना मागे टाकू शकतो. आयर्लंड सध्या 68 गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. आयर्लंड संघाने पुढील वर्षी बांगलादेशविरुद्धच्या तीनपैकी दोन वनडे जिंकले तर तो वेस्ट इंडिजला मागे टाकू शकतो. सध्या वेस्ट इंडिजपेक्षा आयर्लंडचा नेट रन रेट चांगला आहे.

शिवाय, ऑस्ट्रेलिया (70 गुणांसह आठव्या), श्रीलंका (62 गुणांसह दहाव्या) आणि दक्षिण आफ्रिका (49 गुणांसह 11व्या) वेस्ट इंडिजच्या खाली आहेत, परंतु अनेक मालिका बाकी आहेत. ऑस्ट्रेलियाचे 12 सामने, श्रीलंकेचे सहा आणि दक्षिण आफ्रिकेचे 11 सामने बाकी आहेत. सात संघ पात्रता फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर सुपर लीग टेबलमधील शेवटचे पाच संघ (भारताव्यतिरिक्त) पात्र ठरले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

Goa Eco-Tourism Policy: पेडणे ते काणकोण... निसर्गाचा अनमोल ठेवा आता पर्यटकांसाठी खुला! 'इको-टुरिझम' धोरण ठरणार गेमचेंजर; पर्यटनमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं

Goa LPG Cylinder: गोव्यात गॅस सिलिंडरचा किती आहे साठा? CM सावंतांनी दिले दिलासादायक उत्तर; अतिरिक्त पुरवठ्याचीही होणार व्यवस्था

SCROLL FOR NEXT