Stadium
StadiumDainik Gomantak

World Cup 2023 दरम्यान चाहत्यांना घेता येणार अनोखा अनुभव

ICC: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) 2023 च्या ICC क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भूषवायचे आहे.
Published on

World Cup 2023: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) 2023 च्या ICC विश्वचषकाचे यजमानपद भूषवायचे आहे. त्यासाठी बोर्ड पूर्णपणे तयार आहे. दहा संघांची ही स्पर्धा ऑक्टोबरमध्ये सुरु होणार असून ती नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. वर्ल्ड कप संपूर्णपणे भारतात आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने 1987, 1996 आणि 2011 मध्ये पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशसह संयुक्तपणे यजमानपद भूषवले आहे.

दरम्यान, ICC क्रिकेट विश्वचषक सुरुवातीला 9 फेब्रुवारी ते 26 मार्च 2023 या कालावधीत खेळवला जाणार होता, परंतु जुलै 2020 मध्ये, ICC ने घोषित केले की, कोविड-19 महामारीमुळे ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर विंडोमध्ये आयोजित केली जाईल. याशिवाय, आयसीसी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात (Australia) T20 विश्वचषक आयोजित करणार होते.

Stadium
T20 World Cup बाबत आफ्रिदीने केले भाकीत, अंतिम फेरीत या 2 संघांची टक्कर

दुसरीकडे, भारताने (India) 2016 मध्ये टी-20 विश्वचषकही आयोजित केला आहे. तथापि, ठिकाणे अद्याप निश्चित झालेली नाहीत. बीसीसीआयचे (BCCI) खजिनदार अरुण धुमाळ म्हणाले की, 'चाहत्यांना अनेक ठिकाणी जागतिक दर्जाच्या सुविधांचा अनुभव मिळेल.'

Stadium
रिकी पाँटिगची भविष्यवाणी, T20 World Cup 2022 मध्ये हे दोन संघ येणार आमने-सामने

तसेच, अनुभवी क्रीडा पत्रकार विमल कुमार यांच्याशी झालेल्या संभाषणात बीसीसीआयचे खजिनदार म्हणाले, "होय, इथे भारतात आमच्यासमोर काही आव्हाने आहेत. आम्ही वेळापत्रक एक वर्ष अगोदर तयार करु अशा पद्धतीने नियोजन करु शकत नाही. कारण कधीकधी हवामानामुळे शेवटच्या क्षणी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जावे लागते.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com