India 10 m Air Rifle Women's Team 
क्रीडा

Asian Games: पहिल्या दिवशी भारताच्या खात्यात 5 पदके, रोइंग अन् शूटींगमध्ये 'या' खेळाडूंचा डंका

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या खात्यात 5 पदकांची कमाई झाली आहे.

Pranali Kodre

19th Asian Games Hangzhou 1st Day 24th September, India Result:

चीनमधील होंगझाऊ येथे १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू असून २३ सप्टेंबर रोजी स्पर्धेचे उद्धाटन झाले. त्यानंतर २४ सप्टेंबरला स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचे पदकांचे खाते उघडले आहे.

भारताच्या खात्यात पहिल्या दिवसाखेर ५ पदकं जमा झाली असून अनेक खेळाडूंनी पदकांच्या दिशेने वाटचाल केली आहे. भारताला पहिल्या दिवशी रोइंग आणि नेमबाजी प्रकारात पदके मिळाली. दोन पदके ही नेमबाजीमध्ये आणि ३ पदके रोइंगमध्ये मिळाली आहेत. भारत पहिल्या दिवसाखेर सातव्या क्रमांकावर आहे.

नेमबाजीत दोन पदके

मेहुली घोष, रमिता आणि आशी चौक्सी यांच्या महिला रायफल संघाने मिळून भारताला पहिले पदक जिंकून दिले. त्यांनी १० मीटर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकले. त्यांनी १८८६ पाँइंट्स मिळवले. तसेच या प्रकारात चीनने १८९६.६ पाँइंट्ससह सुवर्णपदक जिंकले, तर मंगोलियाने १८८० पाँइंट्ससह कांस्य पदक जिंकले.

तसेट नेमबाजीत दुसरे पदक रमिता जिंदलने जिंकले. तिने महिला १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक जिंकले. चीनच्या हुआंग युतिनने सुवर्णपदक जिंकले, तर चीनच्याच हान जिआयूने रौप्य पदक मिळवले. दरम्यान, भारताची मेहुली घोष चौथ्या क्रमांकवर राहिली.

रोइंगमध्ये भारताचा डंका

रोइंग प्रकारात भारताच्या काही खेळाडूंनी पुढील फेरीत प्रवेश केला असतानाच अर्जून जट लाल आणि अरविंद सिंग यांनी पुरुष लाईटवेट डबल स्कल प्रकारात रौप्य पदकाला गवसणी घातली. त्यांनी ६:४८:१८ सेकंदात शर्यत पूर्ण केली. या प्रकारात चीनच्या जुंजी फान आणि मान सून यांनी ६:२८:१८ सेंकद वेळेसह सुवर्णपदक जिंकले.

तसेच बाबु लाल यादव आणि राम लेख यांनी मेन्स पेअर प्रकारात कांस्य पदक जिंकले. त्यांनी ६:५०:४१ सेकंद वेळ नोंदवली. या प्रकारत हाँग काँगच्या लॅम सान तुंग आणि वाँग वेइ चून यांनी सुवर्णपदक जिंकले, तर उझबेकिस्तानच्या हाकिमोर शेहरोज आणि खुदोयबेर्दिएव दिलशद्जोन यांनी रौप्य पदक जिंकले.

याशिवाय ८ जणांच्या सांघिक प्रकारात भारतीय रोइंग संघाने रौप्य पदकाला गवसणी घातली. या संघात नीरज, नरेश कालवानिया, नितीश कुमार, चरणजीत सिंग, जसविंदर सिंग, भीम सिंग पुनीत कुमार, आशिष आणि धनंजय उत्तम पांडे यांचा समावशे होता. या प्रकारात चीनने सुवर्णपदक जिंकले, तर इंडोनेशियाने कांस्य पदक जिंकले.

क्रिकेटमध्ये पदक पक्के

याशिवाय अनेक क्रीडाप्रकारात भारताचे खेळाडू पुढच्या फेरीत गेले आहेत. दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघाचेही पदक पक्के झाले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने बांगलादेशचा पराभव करत सोमवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे.

तसेच पहिल्या दिवशी पुरुष हॉकी संघाने उझबेकिस्तानचा १६-० असा पराभव केला आहे. भारतीय पुरुष फुटबॉल संघाला मात्र म्यानमारविरुद्ध १-१ अशी बरोबरी स्विकारावी लागली. तसेच महिला संघाला मात्र थायलंडविरुद्ध १-० असा पराभव स्विकारावा लागला.

टेनिसमध्ये साकेत मायनेनी आणि रामकुमार रामनाथन यांनी पहिल्या फेरीत नेपाळच्या अभिषेक बासतोला आणि प्रदिप खडका यांना ६-२,६-३ अशा फरकाने पराभूत केले. त्याचबरोबर सुमीत नागलने मकाऊच्या मार्को हो टीन लेउंग याला ६-०,६-० अशा फरकाने पराभूत केले. तसेच बॉक्सिंगमध्ये भारताच्या निखत जरीनने पहिली फेरी जिंकली आहे.

स्विमिंगमध्ये भारताच्या महिला ४x१०० फ्रिस्टाईल रिले संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर श्रीहरी नटराजने १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT