Indian women's cricket team defeated Bangladesh in the semi final of the Asian Games
Indian women's cricket team defeated Bangladesh in the semi final of the Asian GamesDainik Gomantak

Asian Games: भारतीय महिला क्रिकेट संघाचे पदक पक्कं, बांगलादेशला धूळ चारत फायनलमध्ये एन्ट्री

एशियन गेम्सच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 51 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने दोन गडी गमावून 52 धावा केल्या.
Published on

Indian women's cricket team defeated Bangladesh in the semi final of the Asian Games:

भारतीय महिला क्रिकेट संघाने एशियन गेम्सच्या 2023 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. रविवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ अवघ्या 51 धावांत गारद झाला, भारताने दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह भारताचे पदक निश्चित झाले आहे. अंतिम सामना सोमवार 25 सप्टेंबर रोजी होणार आहे.

भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक नाबाद 20 धावांची खेळी खेळली. अंतिम फेरीत पोहोचून भारतीय महिला क्रिकेट संघाने किमान रौप्य पदक पक्कं केले आहे.

आता अंतिम सामन्यात भारताचा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशी संघाने सुरुवातीपासूनच विकेट्स गमावल्या. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर त्यांनी सलामीची विकेट गमावली.

पॉवरप्लेमध्ये बांगलादेशने एकूण चार विकेट गमावल्या, त्यापैकी पूजा वस्त्राकरने तीन विकेट घेतल्या. बांगलादेशच्या विकेट पडण्याचा सिलसीला सुरूच राहिला त्यामुळे त्यांचा संपूर्ण संघ 17.5 षटकांत 51 धावांत गारद झाला.

Indian women's cricket team defeated Bangladesh in the semi final of the Asian Games
Ind vs Aus 2nd ODI, Playing XI: दुसऱ्या वनडेत अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन, सिराज करणार पुनरागमन

बांगलादेशकडून केवळ कर्णधार निगार सुलतानाला (१२) दुहेरी आकडा गाठता आला. पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही.

भारताकडून पूजा वस्त्राकरने 4 षटकात 17 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले. तर तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, देविका वैद्य आणि अमनजोत कौर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Indian women's cricket team defeated Bangladesh in the semi final of the Asian Games
BAN vs NZ: बांगलादेशचा न्यूझीलंडकडून 15 वर्षांनी घरच्या मैदानावर पराभव, ईश सोढी ठरला 'मॅचविनर'

यावेळी एशियन गेम्समध्ये क्रिकेटचाही समावेश आहे. 2014 च्या एशियन गेम्समध्ये देखील क्रिकेटचा समावेश होता. मात्र BCCI ने पुरुष व महिला संघ पाठवला नव्हता. पण यावेळी भारताचा महिला आणि पुरुष क्रिकेट संघ सहभागी होत आहे.

2010 च्या गेम्समध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानने अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात सुवर्णपदक जिंकले. 2014 मध्ये श्रीलंकेने पुरुष गटात सुवर्ण आणि पाकिस्तानने महिला गटात सुवर्णपदक जिंकले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com