Australia - New Zealand 
क्रीडा

IPL 2024 लिलावासाठी तब्बत 1166 खेळाडूंनी केलं रजिस्ट्रेशन! 'या' खेळाडूंची बेस प्राईज 2 कोटी

IPL 2024 Auction: आयपीएल 2024 लिलाव 19 डिसेंबरला पार पडणार असून यासाठी 1166 खेळाडूंनी नाव नोंदवले आहे.

Pranali Kodre

IPL 2024 Players auction:

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईमध्ये होणार आहे. या लिलावासाठी संघांची तयारी सुरू झाली आहे. सर्व संघांनी आपल्या संघात कायम केलेल्या आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी यापूर्वीच जाहीर केली आहे. आता सर्वांना लिलावाचे वेध लागले आहेत.

दरम्यान, यंदा लिलावात अनेक मोठे खेळाडू दिसणार आहेत. यामध्ये ट्रेविस हेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ अशा ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप विजयात मोलाचा वाटा उचललेल्या खेळाडूंचाही समावेश आहे. तसेच उमेश यादव, शार्दुल ठाकूर, केदार जाधव अशा भारतीय खेळाडूंचाही लिलावात समावेश असणार आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार 1166 खेळाडूंनी लिलावासाठी नावनोंदणी केली आहे. ही नावं फ्रँचायझींना पाठवण्यात आली असून त्यातील नावे फ्रँचायझींकडून शॉर्ट लिस्ट केली जाणार आहेत.

या 1166 खेळाडूंमध्ये आयसीसीच्या सहसदस्य संघांतील ४५ खेळाडूंचा समावेश आहे, तसेच 909 अनकॅप खेळाडूंचा (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले) समावेश आहे, ज्यात 812 भारतीय खेळाडू आहेत. तसेच 18 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले भारतीय खेळाडूंनीही लिलावासाठी नाव नोंदवले आहे.

दरम्यान, 10 संघात मिळून केवळ 77 जागा रिक्त आहेत. यामधील 30 जागांवर परदेशी खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. तसेच लिलावात 10 संघ मिळून जास्तीत जास्त 262.95 कोटी रुपये खर्च करू शकतात.

दरम्यान, यंदा सर्वाधिक लक्ष हे न्यूझीलंडचा युवा अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्रच्या बोलीकडेही असणार आहे. त्याने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सर्वांना प्रभावित केले होते. त्यामुळे त्याला मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. त्याची मुळ किंमत 50 लाख असणार आहे.

त्याच्याव्यतिरिक्त वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार पटकावणाऱ्या ट्रेविस हेडवरही मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. त्याने त्याची मुळ किंमत 2 कोटी ठेवली आहे.

याशिवाय मिचेल स्टार्कही आठ वर्षांनी आयपीएल खेळताना दिसू शकतो. तो 2015 साली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून अखेरीस आयपीएल खेळले होते. त्यानंतर 2018 मध्ये तो आयपीएलमध्ये खेळणार होता, मात्र दुखापतीमुळे त्याला खेळता आले नाही. आता आठवर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमनासाठी तो सज्ज आहे.

दरम्यान, आयपीएलच्या लिलावासाठी 2 कोटी, 1.50 कोटी, 1 कोटी, 75 लाख, 50 लाख आणि 20 लाख अशा विभागात खेळाडूंनी आपापल्या मुळ किंमती ठरवल्या आहेत. 2 कोटींची मुळ किंमत तब्बल 25 खेळाडूंनी ठेवली आहे. दरम्यान, यात आता किती खेळाडू शॉर्ट लिस्ट होणार हे देखील पाहावे लागणार आहे.

2 कोटींची मुळ किंमत असलेले खेळाडू

हर्षल पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केदार जाधव, मुजीब उर रहमान, सीन ऍबॉट, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, मुस्तफिजूर रहमान, टॉम बँटन, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, लॉकी फर्ग्युसन, गेराल्ड कोएत्झी, रिली रॉसौ, रॅसी वॅन डर ड्यूसेन, अँजेलो मॅथ्यूज.

1.50 कोटींची मुळ किंमत असलेले खेळाडू

मोहम्मद नबी, मोझेस हेन्रिक्स, ख्रिस लिन, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, डॅनियल वॉरॉल, टॉम कुरन, मर्चंट डी लँग, ख्रिस जॉर्डन, डेविड मलान, टायमल मिल्स, फिल सॉल्ट, कोरी अँडरसन, कॉलिन मुनरो, जिमी नीशम, टीम साउदी, कॉलिन इंग्राम, वानिंदू हसरंगा, जेसन होल्डर, शेरफेन रदरफोर्ड

1 कोटींची मुळ किंमत असलेले खेळाडू

ऍश्टन एगर, रिले मेरेडिथ, डी'आर्सी शॉर्ट, ऍश्टन टर्नर, गस ऍटकिन्सन, सॅम बिलिंग्स, मायकेल ब्रेसवेल, मार्टिन गप्टिल, काइल जेमिसन, ऍडम मिल्ने, डॅरिल मिचेल, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, अल्झारी जोसेफ, रोव्हमन पॉवेल, डेव्हिड विसे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT