Zombie Virus Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Zombie Virus: जग पुन्हा कोरोनासारख्या नव्या व्हायरसच्या विळख्यात

Zombie Virus: हा व्हायरस जिवंत झाला तर कोरोनासारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.

दैनिक गोमन्तक

Zombie Virus: कोरोना महामारीच्या विळख्यातून जग आता कुठे सावरत आहे, तेच नव्या व्हायरसची भीती जगाला सतावतेय. रशियातील एका तलावाखालचा हजारो वर्ष जुना व्हायरस जिवंत केल्याचा दावा फ्रेंच शास्त्रज्ञांनी केला आहे. हा व्हायरस जिवंत झाला तर कोरोनासारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, जगात तापमान वाढ झाल्याने मानवाच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. तापमान वाढीमुळे हवामानातील बदलामुळे बर्फातील पर्माफ्रॉस्ट झपाट्याने वितळत आहेत. यामुळे अनेक जुने विषाणू पुन्हा जिवंत झाल्याचा दावा केला जातो आहे.

हा व्हायरस 45,500 वर्ष जुना असल्याचे सांगितले जात आहे. युरोपातील संशोधकांनी रशियाच्या सायबेरिया प्रदेशात आढळलेल्या प्राचीन नमुन्यांची तपासणी केली आहे. त्यात शास्त्रज्ञांनी 13 नवीन सूक्ष्मजंतू शोधून काढले आहेत. शास्त्रज्ञांनी याला 'झोम्बी व्हायरस' असे नाव दिले आहे. रशिया, जर्मनी आणि फ्रान्स देशांच्या संशोधकांच्या (scientist) गटाने सांगितले की, हे विषाणू अतिशय धोकादायक आहेत. मानवाला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते.

Zombie Virus

याविषयीच्या अहवालानुसार, तापमान वाढीमुळे उत्तर गोलार्धात एक चतुर्थांश गोठलेली जमीन वितळत आहे. यामुळे लाखो वर्षांपासून त्याखालील गोठलेले सेंद्रिय पदार्थ बाहेर पडतात, तसेच त्याखाली अनेक घातक सूक्ष्मजंतू असतात. संशोधक याबाबत सांगतात की, वितळणाऱ्या बर्फाच्या या सेंद्रिय पदार्थाच्या भागामध्ये लपलेले सूक्ष्मजंतू तसेच हजारो वर्ष जिवंत असलेले विषाणू यांचा धोका मानवाला सर्वाधिक असतो.

कोरोना व्हायरसने (Virus) जगात थैमान घातले होते. त्यामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला. बऱ्याच देशांचे व्यवहार अनेक महिने लॉकाडाऊनमुळे बंद होते. जगातील अनेक देशांमध्ये बेकारी वाढली, प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले. अशी वेळ परत जगावर आली तर काय होईल? या कल्पनेनेच लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

Mayna Construction Project: बांधकाम प्रकल्पाविरोधात मोर्चा, मायणावासीय आक्रमक; कुडतरी पंचायतीवर धडक

iPhone 17 Pro वर भन्नाट डील! 1.34 लाखांचा फोन फक्त 56,990 रुपयांत, जाणून घ्या ऑफर

"पीओके तात्काळ खाली करा!" UN च्या मंचावरुन भारताचा पाकिस्तानला सज्जड दम; मानवाधिकार परिषदेत दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांचे धुडकावले दावे

SCROLL FOR NEXT