World Book and Copyright Day 2023: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Book and Copyright Day 2023: जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिनानिमित्त जाणून घ्या खास गोष्टी

दरवर्षी २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

World Book and Copyright Day 2023: जगभरातील अनेकांना पुस्तके वाचायला आवडतात. जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दरवर्षी 23 एप्रिलला साजरा केला जातो. हा दिवस केवळ देशातच नाही तर जगभरात साजरा केला जातो. जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देशांपैकी एक म्हणजे पुस्तक वाचनाची आवड वाढवणे हा आहे. चला तर मग आज जाणुन घेउया या दिनानिमित्त अधिक माहिती.  

  • जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस

जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दरवर्षी युनेस्कोद्वारे आयोजित केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे पुस्तकांचे वाचन, लेखन, भाषांतर, प्रकाशन आणि कॉपीराइटचे महत्त्व दाखवून देणे आहे.

हा दिवस देखील विशेष आहे, कारण 23 एप्रिल हा जागतिक साहित्यात महत्त्वपूर्ण आहे. कारण या तारखेला मिगुएल डी सर्व्हंटेस आणि विल्यम शेक्सपियर सारख्या प्रमुख लेखकांच्या मृत्यूचे स्मरण होते.

  • 3 एप्रिल 2022 इतिहास

पहिल्यांदा जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन 23 एप्रिल 1995 मध्ये साजरा करण्यात आला. युनेस्कोने विल्यम शेक्सपियर आणि मिगुएल सर्व्हंटेस यांसारख्या लेखकांना आदर देण्यासाठी 23 एप्रिल हा दिवस खास निवडला होता. 

हा दिवस 1922 मध्ये स्पॅनिश लेखक व्हिसेंट क्लेव्ह आंद्रेस यांनी मिगुएल सर्व्हंटेसचे स्मरण आणि सन्मान करण्याच्या उद्देशाने प्रथमच साजरा केला होता. त्यानंतर 23 एप्रिल 1995 रोजी पॅरिसमध्ये झालेल्या UNESCO जनरल कॉन्फरन्ससाठी ही नैसर्गिक निवड होती. जेणेकरून या दिवसाच्या माध्यमातून लोकांना पुस्तक वाचनासह इतर गोष्टींची जाणीव करून देता येईल.

  • काँपीराइट म्हणजे काय?

एका लेखकाने लिहिलेल्या साहित्य चोरी (Copyright) म्हणजे काँपीराईट होय. काँपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्यास आपल्याला शिक्षा आणि दंड होउ शकतो. यामुळेच कंटेट तयार करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने जागृत राहणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "हे 33 नरकासुर गोवा जाळतील", श्रीकृष्ण विजयोत्सवात विरोधी पक्षांची वज्रमुठ; सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान?

Quelossim: समुद्र किनाऱ्यावर भरला ‘दिवाळी बाजार’! केळशी पंचायतीचा अभिनव उपक्रम; स्थानिकांसह पर्यटकांनीही घेतला लाभ

Mandrem Accident: भरधाव ट्रकची स्कुटरला धडक, अपघातात महिलेचा मृत्यू; पुराव्यांअभावी चालकाची निर्दोष सुटका

Goa Live News: माशे येथे नरकासुर स्पर्धा गोंधळात, दोघांना अटक; नंतर जामीन मंजूर

Anjuna Assault: धारदार शस्त्राने डोक्यावर केला वार, 1 महिन्यानंतर पीडित व्हेंटिलेटरवरच; संशयिताचा जामीन फेटाळला

SCROLL FOR NEXT