Watermelon Benefits: 'हा' ज्यूस आरोग्यासह त्वचेसाठीही फायदेशीर; 2 आठवड्यात पिंपल्स होतील दूर

टरबूजच्या मदतीने त्वचेची समस्या दूर करू शकता आणि चेहऱ्यावर झटपट चमक देखील मिळवू शकता.
Watermelon Benefits For Skin
Watermelon Benefits For SkinDainik Gomantak
Published on
Updated on

Watermelon Benefits For Skin: कडक उन्हामुळे आणि घामामुळे त्वचेवर सर्वाधिक परिणाम होतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य काळजी न घेतल्यास, त्वचेवर पुरळ उठू लागते, कोरडेपणा येऊ लागतो, चमक नाहीशी होते आणि सुरकुत्या वेगाने वाढू लागतात.

जर तुम्हालाही अशाच काही समस्यांचा सामना करावा लागत असेल तर टरबूज तुमच्या समस्या सहज दूर करू शकतात. होय, तुम्ही टरबूजच्या मदतीने त्वचेची समस्या दूर करू शकता आणि चेहऱ्यावर झटपट चमक देखील मिळवू शकता.

Watermelon Benefits For Skin
Milk Benefits For Skin: तुमच्या स्कीन केअर रुटीनमध्ये करा दुधाचा समावेश; होतील हे फायदे

अशा प्रकारे करा वापर वापर

साहित्य

  • 4 ते 5 टरबूजाचे तुकडे

  • 2 चमचे दही

फेस पॅक रेसिपी

सर्व प्रथम एका भांड्यात दही घेऊन चांगले फेटून घ्या. आता टरबूजाचे तुकडे ब्लेंडिंग जारमध्ये ठेवा आणि चांगले फेटून घ्या. आता दही आणि टरबूजाचा रस मिक्स करा. तुमचा फेस पॅक तयार आहे.

अशा प्रकारे वापरा

आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि पुसून घ्या. आता हा पॅक ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर चांगला लावा. तुम्ही तो मानेवरही लाऊ शकता. आता 10 ते 15 मिनिटे फेस पॅक सुकू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

या फेस पॅक फायदे

  • टरबूजमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-एजिंग गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळतात, ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या कमी होतात.

  • टरबूजमध्ये भरपूर पाणी असते, जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्यामुळे त्वचेला ओलावाही मिळतो.

  • टरबूजमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे पिंपल्सची समस्या दूर ठेवण्याचे काम करतात. यामुळे चेहऱ्याला थंडावा मिळतो आणि पिंपल्स कमी होतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com