Women's Day  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Women's Day 2024: महिलांनी 'या' कारणांसाठी व्हिटॅमिन्सची केली पाहिजे तपासणी

Women's Health Care: वेळावेळी आरोग्य तपासणी करणे गरजेचे असते. शरीरात त्याच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. महिलांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.

Puja Bonkile

women's day 2024 why vitamin testing important for women fitness

महिला कुटुंबाचा आधारस्तंभ आहेत. एवढेच नाही तर आजच्या काळात महिला व्यावसायिक जीवनात कोणाच्याही मागे नसून प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा फडकवत आहेत. घरात आई-वडिलांची काळजी घेणे असो, पती आणि मुलांच्या गरजांची काळजी घेणे असो किंवा करिअरचे ध्येय गाठणे असो, ही सर्व कामे महिला अतिशय चोखपणे करतात.

पण या सगळ्यात कुठेतरी तिचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. महिलांच्या शरीरात आवश्यक व्हिटॅमिन्स आणि खनिजांची कमतरता अनेकदा दिसून येते.

कारण महिला त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि आरोग्याशी संबंधित लक्षणांकडे लक्ष देत नाहीत.

शरीरात आवश्यक व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे अनेक लक्षणे दिसू लागतात, ज्यांची वेळीच काळजी न घेतल्यास भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. आवश्यक व्हिटॅमिन्स आणि खनिजे वेळोवेळी तपासणे फार महत्वाचे आहे.

शरीरात त्यांच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. डॉक्टरांचा सल्ला घेऊन महिलांनी व्हिटॅमिन्सची चाचणी करावी. यंदा महिला दिनानिमित्त तुम्ही व्हिटॅमिन्सची तपासणी करून वेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करू शकता आणी त्याचे आरोग्य निरोगी ठेऊ शकता.

व्हिटॅमिन्सची कमतरता माहिती पडणे

व्हिटॅमिन टेस्टिंगमुळे शरीरातील व्हिटॅमिन्सची कमतरता योग्य वेळी ओळखता येते. व्हिटॅमिन डी, बी12 आणि सी च्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्तीवर विपरित परिणाम होतो आणि अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हे योग्य वेळी आढळून आल्यास त्यावर नियंत्रण मिळवता येते.

आहाराकडे लक्ष द्यावे

शरीरात कोणत्या व्हिटॅमिनची कमतरता आहे हे एकदा कळले की ते वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष देऊ शकता. उदाहरणार्थ, जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर ती समस्या कमी करण्यासाठी तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी 12 समृद्ध पदार्थांचा समावेश करावा. शरीरातील जीवनसत्त्वांची पातळी कमी झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आजारांना ठेवते दूर

शरीरात व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे अनेक जीवघेणे आजारही होऊ शकतात. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हृदयरोग, मानसिक आरोग्य आणि पचन यांसह अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या व्हिटॅमिनची दीर्घकाळ तपासणी केली नाही तर तुम्ही एखाद्या मोठ्या आजाराला बळी पडू शकता.

निरोगी राहण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन्स, खनिजे आणि हार्मोन्सची योग्य पातळी असणे खूप महत्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT