Relationship Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Love Story: बापरे ! 6 वर्षांपासुन ज्याला प्रियकर म्हणुन जीव लावला तो निघाला तिचाच भाऊ...

एक मुलगी ज्या मुलाला डेट करत होती तो निघाला तिचाच भाउ..वाचा अजब गजब घडलेली घडना

दैनिक गोमन्तक

आपल्या अनेक लव्ह स्टोरीज ऐकायला मिळतात. यातील काही स्टोरी अशा आहेत की त्या आठवणीत ठरतात. अलीकडेच आणखी एक लव्हस्टोरी समोर आली आहे. ज्यामध्ये महिलेने तिच्या लव्ह लाईफबद्दल सांगितले आहे. 

आपले एक गुपित सांगताना महिलेने सांगितले की, ती 6 वर्षांपासून एका पुरुषाला डेट करत होती. त्याची डीएनए चाचणी केली असता तो त्याचा बायोलॉडजिकल भाऊ असल्याचे आढळून आले. 

महिलेने अद्याप ही गोष्ट तिच्या प्रियकराला सांगितलेली नाही. ही बाब धक्कादायक आहे कारण जगात कोट्यवधी लोक आहेत आणि कोट्यवधी लोकांपैकी तोच मुलगा तिचा भाऊ कसा निघाला, यावर मुलीचे काय म्हणणे आहे? याबद्दल देखील जाणून घ्या.

  • दोघांची अशी झाली भेट

डेलीस्टारच्या वृत्तानुसार, एका महिलेने Reddit वर एका ऑनलाइन पोस्टमध्ये सांगितले की, ती एका पुरुषाला जवळपास 6 वर्षांपासून डेट करत आहे आणि तो तिचा बायोलॉजिकल भाऊ आहे. 

त्या महिलेने सांगितले, "मी 30 वर्षांची आहे आणि माझा प्रियकर 32 वर्षांचा आहे. मला एका कुटुंबाने दत्तक घेतले होते आणि मी हायस्कूलमध्ये येईपर्यंत मला याबद्दल माहिती नव्हती. माझा प्रियकर तो देखील दत्तक घेतलेला आहे. या कॉमन गोष्टीमुळे आम्ही दोघे मित्र झालो आणि आम्हाला एकमेकांसोबत राहायला आवडायला लागले.

महिलेने पुढे सांगितले की, "आम्हा दोघांनाही एका चांगल्या कुटुंबाने दत्तक घेतले होते. आमचे नाते चांगले चालले होते कारण आम्ही एकमेकांकडे खूप आकर्षित होतो. माझ्या आयुष्यात माझ्या बॉयफ्रेंडसारखा कोणीही आला नाही, ज्याच्याकडे मी इतक्या लवकर आकर्षित झाले.

त्याच्यासोबत खूप आरामदायक वाटणे. त्याच्यासोबत नाते निर्माण करण्यापासून ते रोमान्सपर्यंत प्रत्येक क्षण आम्ही खूप छान जगलो आहोत. बरेच लोक आम्हाला सोबत पाहुन म्हणायचे की आम्ही एकसारखे दिसतो आणि यामुळे मला खूप आनंद झाला.

  • असा खुलासा झाला

ती महिला पुढे म्हणाली, "जेव्हा लोक म्हणायचे की आम्ही दोघे सारखे दिसतो, तेव्हा आम्ही काय आहोत हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती. यासाठी मी दोघांची डीएनए चाचणी केली. अहवाल समोर आल्यावर मला धक्काच बसला.

डीएनए अहवालात तो माझा बायोलॉडजिकल भाऊ असल्याचे समोर आले. मी अद्याप त्याला याबद्दल काहीही सांगितले नसले तरी, मला ते स्वतः समजू शकत नाही. अहवाल चुकीचा असू शकतो असे मला वाटते."

  • डीएनए चाचणी म्हणजे काय? 

क्लीव्हलँडक्लिनिकच्या मते, डीएनए चाचणीला अनुवांशिक चाचणी देखील म्हटले जाऊ शकते. ही एक प्रकारची चाचणी आहे जी शरीरातील जीन्स, क्रोमोसोम किंवा प्रथिनांमधील बदल ओळखू शकते. अनुवांशिक चाचणी रक्त, त्वचा, केस, ऊतक किंवा अम्नीओटिक द्रवपदार्थाच्या नमुन्याद्वारे केली जाऊ शकते. 

अनुवांशिक चाचणी तुमच्या जीन्स, गुणसूत्र आणि प्रथिनांमधील बदल शोधते. डीएनए चाचणी तुम्हाला तुम्ही कोण आहात हे ठरवणार्‍या जनुकांबद्दल बरीच माहिती देऊ शकते. डीएनए चाचणी तुम्हाला विशिष्ट आजार आहे की नाही याची खात्री मिळु शकते. 

डीएनए चाचणी हे देखील सांगू शकते की तुम्हाला काही विशिष्ट परिस्थिती विकसित होण्याचा धोका किती आहे. डीएनए चाचणी देखील तुमच्या शरीरात काही विशिष्ट जीन्स आहेत की नाही हे देखील शोधू शकते जे कदाचित उत्परिवर्तित होऊन तुमच्या मुलाकडे गेले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT