Mobile: नवा मोबाईल घेताय? थांबा, 'मे' मध्ये येतायत हे भन्नाट स्मार्टफोन्स...

जर तुम्ही लेटेस्ट फिचर असलेला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी शेवटपर्यत नक्की वाचा
Mobile Shopping Tips
Mobile Shopping TipsDainik Gomantak

Mobile: जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पुढिल महिन्यात म्हणजेच मे महिन्यात अनेक उत्तम स्मार्टफोन लाँच होत आहेत. यामध्ये Realme, Google आणि OnePlus चे स्मार्टफोनचा समावेश आहेत. यामध्ये बहुतेक मिड-रेंज स्मार्टफोन्स आहेत, चला तर मग जाणून घेऊया मे मध्ये कोणते स्मार्टफोन्स लाँच होत आहेत.

  • Realme 11 Pro, Realme 11 Pro+

Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ मे मध्ये लाँच होतील. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंशन 7000 चिपसेट दिला जाऊ शकतो. Realme 11 Pro+ स्मार्टफोनच्या मागील बाजूस 200 MP प्राथमिक कॅमेरा सेन्सर दिला जाईल. 

फोनला 6.7-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले दिला जाईल. याशिवाय 16 एमपी फ्रंट कॅमेरा दिला जाईल. तसेच, 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली जाईल. Realme 11 Pro च्या मागील पॅनलवर 108 MP चा प्राइमरी कॅमेरा दिला जाईल. तसेच, 67W फास्ट चार्जसह 5,000mAh बॅटरी मिळू शकते.

Mobile Shopping Tips
Google Pixel Fold व्हिडिओ लीक, लाँच होण्यापुर्वीच पाहा फोनचे डिझाईन
  • Pixel 7a
    Pixel 7a 10 मे रोजी Google च्या I/O इव्हेंटमध्ये जागतिक स्तरावर लाँच केला जाऊ शकतो. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, हा फोन Pixel 6a स्मार्टफोनचा एक मोठा अपग्रेड असू शकतो. Pixel 7a मध्ये मोठी बॅटरी, 90Hz डिस्प्ले, Google चा नवीन फ्लॅगशिप चिपसेट आणि चांगला रियर कॅमेरा सेटअप असेल.

  • Pixel Fold
    Google त्याचा फोल्ड करण्यायोग्य स्मार्टफोन Google Pixel Fold Google I/O इव्हेंटमध्ये लाँच करेल, जो 10 मे रोजी सुरू होणार आहे. पिक्सेल फोल्डमध्ये फोल्ड केल्यावर 5.8-इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. तर उलगडल्यावर 7.6-इंचाचा डिस्प्ले मिळेल. यामध्ये Tensor G2 चिपसेट सपोर्ट दिला जाईल. त्याची किंमत जवळपास 1,39,830 रुपये असू शकते.

  • OnePlus Nord 3
    OnePlus Nord 3 स्मार्टफोन मे अखेरीस किंवा जूनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या मिड-रेंज 5G स्मार्टफोनमध्ये 4,500mAh किंवा 5,000mAh बॅटरी असू शकते. कंपनी 100W फास्ट चार्जरसाठी सपोर्ट देऊ शकते. 

    OnePlus Nord 2T मध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच, 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट मिळू शकतो. OnePlus Nord 3 च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com