Winter Skin Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Skin Care: आला हिवाळा; त्वचा कोरडी पडत असेल तर वेळीच 'या' गोष्टी पाळा

Skin Care Tips: हवेत वाढणाऱ्या गारव्यामुळे त्वचा खराब होऊ शकते, तुमच्या त्वचेकडे दररोज लक्ष देण्याची गरज आहे.

Akshata Chhatre

Skin Care Tips For Winter

डिसेंबर महिना सुरु झाल्यापासून हळूहळू थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला जर का थंडीचा भरपूर त्रास होत असेल तर काही योग्य उपाय वेळीच करून पहा, कारण हवेत वाढणाऱ्या गारव्यामुळे त्वचा खराब होऊ शकते. वाढणारी रुक्षता रोजचा त्रास झाली असेल ना? तुमच्या त्वचेकडे दररोज लक्ष देण्याची गरज आहे हे कायम लक्षात ठेवा.

१) योग्य साबणायची निवड करा:

आंघोळीच्या वेळी आपण कोणता साबण वापरतो हे महत्वाचं आहे. तुम्ही जर का रुक्ष साबण वापरत असाल तर यामुळे त्वचा आणखीन कोरडी आणि रुक्ष होऊ शकते, त्यामुळे सौम्य साबण वापरा आणि शक्यतो ग्लिसरीनचा वापर करा.

साहजिकपणे बाहेर गारवा वाढला म्हणजे आपल्याला उबदार वातावरण हवंहवंसं वाटतं. मग आपण गरम पाणी पितो, गरम पाण्याची अंघोळ करतो, उबदार कपडे वापरतो. ठीक आहे मात्र गरम पाण्याने पुन्हा पुन्हा अंघोळ करू नका. गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील रुक्षता वाढते.

२) मॉइस्चराइजरचा वापर करा:

थंडीच्या दिवसांत सर्वाधिक वापर करावा तो म्हणजे मॉइस्चराइजरचा. यामुळे त्वचा कोरडी होत नाही आणि मऊ राहायला मदत मिळते. तसेच आंघोळ करण्यापूर्वी थोडंसं तेल लावा यामुळे शरीरातील मोइशुराईझींग कायम राहायला मदत मिळते.

३) भरपूर पाणी प्या:

थंडीच्या दिवसांत आपोआप पाणी पिणं कमी होतं, पण लक्ष्यात ठेवा तुमच्या शरीराला हायड्रेटेड राहण्यासाठी पाण्याची भरपूर गरज असते. कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासात असुद्या पाणी पिणं कधीच विसरू नका.

४) मास्कचा वापर करा:

बाजारात काही मास्क असे असतात जे रात्री लावून झोपल्याने सकाळी त्वचा कोरडी पडत नाही. या मास्कमध्ये सेरामाइड्स, पेप्टाइड्स आणि हाइलूरोनिक एसिड असते ज्यामुळे रात्रभर त्वचेला हवा असलेला ओलावा मिळतो आणि परिणामी सकाळी उठल्या-उठल्या त्वचा टवटवीत राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT