Garlic Paneer Tikka Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Recipe: हिवाळ्यात घरीच घ्या गार्लिक पनीर टिक्का, नोट करा रेसिपी

तुम्हाला हिवाळ्यात चटपटीत खायचे असेल तर गार्लिक पनीर टिक्का घरीच ट्राय करू शकता.

Puja Bonkile

Winter Recipe: हिवाळा सुरू झाला असून अनेक चटपटीत पदार्थ खावेसे वाटत असतात. म्हणूनच बरेच लोक गरमा-गरम आणि कुरकुरित पकोडे, चटणी किंवा कबाब मोठ्या आवडीने खातात. पनीरपासून देखील तुम्ही चटपटीत पदार्थ तयार करू शकता. पनीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. चला तर मग जाणून घेऊया गार्लिक पनीर टिक्का कसा बनवाव.

  • गार्लिक पनीर टिक्का बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पनीर - 400 ग्रॅम

दही - 1/2 कप

क्रीम - 2 चमचे

लसूण पेस्ट - 3 चमचे

लसूण पाकळ्या - 6-7 पाकळ्या

धणे पावडर - 1 टीस्पून

मिरची पेस्ट - 1 टीस्पून

बेसण - 1 चमचा

तेल - 1 चमचा

  • गार्लिक पनीर टिक्का रेसिपी 

गार्लिकपनीर टिक्की बनवणे खूप सोपे आहे. यासाठी एका भांड्यात दही, मलई, बेसन आणि धने पावडर घालून चांगले मिक्स करा. मिक्स केल्यानंतर मिश्रण काही वेळ बाजूला ठेवा.

नंतर या मिश्रणात काळी मिरी पावडर, मिरची पावडर, लसूण पेस्ट आणि लसूण पाकळ्या घालून चांगले मिक्स करा. मिक्स केल्यानंतर, सुमारे 10 मिनिटे बाजूला ठेवा.

नंतर पनीरचे चौकोनी तुकडे करा. पनीरचे चौकोनी तुकडे केल्यानंतर ते लसणाच्या मिश्रणात घालून चांगले मिसळा. मिक्स केल्यानंतर, पनीरचे चौकोनी तुकडे रेफ्रिजरेटरमध्ये सुमारे 30-35 मिनिटे ठेवा. नंतर एका कढईत तेल किंवा बटर टाकून ते गरम करावे लागेल. तेल गरम झाल्यावर त्यात पनीरचे चौकोनी तुकडे घालून दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्यावे. 

कुरकुरीत आणि सोनेरी तपकिरी गार्लिक पनीर तयार झाल्यानंतर, तुम्ही हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख- समाजाच्या संवेदनांची हत्या..! क्लब मालक, अधिकारी अन् नियंत्रण यंत्रणांच्या कुचराईत 25 निष्पाप जिवांनी गमावला जीव

दारु प्यायली, फ्रिजमधील खाद्यपदार्थ खाल्ले अन् पैसे, सोन्याचे दागिने चोरुन पसार झाले; पाजीफोंड येथे 9 लाखांची चोरी

पर्यटन हवयं, मृत्यूचा नंगानाच नको! गोव्यातील क्लब, पब्जसाठी ठोस कायद्याची गरज; 'करमणुकीचा कार्यक्रम' ही पळवाट बंद करा- संपादकीय

'इंडिगो'चा अहंकार अन् केंद्राचे लोटांगण! नियम मोडल्याने देशातील लाखो प्रवाशांना 'मनस्ताप'; सरकारवरही ओढावली नामुष्की-संपादकीय

Goa Crime: 'तलवार बाळगणे म्हणजे प्रतिबंधित शस्त्र नव्हे'! कोर्टाने केली दोन आरोपींची सुटका; पोलिसांचे फेटाळले आरोप

SCROLL FOR NEXT