Dry Lips Remedies at Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Care Tips : हिवाळ्यात कोरड्या ओठांची अशी घ्या काळजी; लक्षात ठेवा या गोष्टी

ओठांची काळजी घेण्यासाठी नियमितपणे त्यावरील मृत त्वचा काढून टाकणे आवश्यक असते.

दैनिक गोमन्तक

हिवाळा सुरू होताच त्वचा कोरडी पडू लागते. परंतु फाटलेल्या आणि कोरड्या ओठांची समस्या आधी जाणवते. अनेकांना इतका त्रास होतो की ओठातून रक्त येवू लागते. अशावेळी लिप बाम लावला तरी ओठ अजिबात मऊ होत नाहीत. चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात ओठांची कशी काळजी घ्यावी. (Dry Lips Remedies at Home)

ओठांवरची मृत त्वचा काढून टाकावी

ओठांची काळजी घेण्यासाठी नियमितपणे त्यावरील मृत त्वचा काढून टाकणे आवश्यक असते. यासाठी दोन चमचे बेकिंग सोडा एक चमचा पाण्यात मिक्स करावे. हे मिश्रण ओठांवर लवावे आणि बोटांचा वापर करून हळूवार चोळावे. नंतर ओठ पाण्याने स्वच्छ धुवावे आणि टिश्यूने पुसावे. त्यानंतर ओठांवर ऑलिव्ह ऑईल लावावे. असे केल्याने ओठांची मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते.

Cracked Lips Remedies at Home

या गोष्टी लक्षात ठेवाव्या

  • अनेकांना ओठांना पुन्हा पुन्हा स्पर्श करण्याची सवय असते. असे केल्याने फाटलेल्या ओठांची समस्या वाढू शकते. त्यामुळे असे करू नका. याशिवाय ओठांवर वारंवार हात लावल्याने खाज सुटू शकते.

  • अनेकजण ओठांवर जीभ फिरवतात, असे केल्याने ओठ अधिकच फुटू शकतात. जर तुम्हाला अशी सवय असेल तर ती करणे बंद करा.

  • हिवाळ्यात अनेक लोक पाणी पिणे कमी करतात. हे देखील ओठ फाटणे आणि कोरडे होण्याचे कारण असू शकते. ओठांच्या त्वचेवर पाण्याची आणि आर्द्रतेची कमतरता असते. त्यामुळे हिवाळ्यात पुरेसे पाणी प्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Train Ticket Discount: सणासुदीचा प्रवास होणार स्वस्त, रेल्वेकडून 'राउंड ट्रिप पॅकेज'; वाचा नेमकी योजना काय?

Weekly Horoscope: प्रेम, व्यवसायात शुभ योग! कसा असेल पुढचा आठवडा? जाणून घ्या..

Kudnem: कौंडिण्य ऋषींच्या नावाचा अपभ्रंश होऊन झालेले 'कुडणे', लुकलुकणाऱ्या काजव्यांची जत्रा भरून प्रकाशित होणारे मंदिर

Goa Cricket: ..आणखी एक 'क्रिकेटर' सोडणार होती गोवा! संघटनेची शिष्टाई सफल; सराव शिबिरास सुरवात

Goa Live News: वाळपई नवोदय विद्यालयासाठी मंजूर झालेले निधी वापरता येणार नसल्यामुळे आवश्यक कामे प्रलंबित

SCROLL FOR NEXT