Winter Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Care: हिवाळ्यात 'या' 7 गोष्टी ठेवाव्या बॅगेत, येणार नाही कोणतीही अडचण

हिवाळा अधिक आनंददायी बनवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या बॅगमध्ये पुढील काही गोष्टी ठेवणे गरजेचे आहे. ज्यामुळे छोट्या छोट्या गरजा पूर्ण होऊ शकतात.

Puja Bonkile

Winter Care: हिवाळ्यात त्वचेची आणि आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. तुम्ही घराबाहेर जात असाल तर काही गोष्टी तुमच्या बॅगमध्ये नक्की ठेवल्या पाहिजे. ज्यामुळे तिच्या किरकोळ गरजा पूर्ण होऊ शकतात आणि हिवाळ्यात होणाऱ्या समस्यांपासून बचाव करू शकतात.

मॉइश्चरायझर

हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी पडते. फक्त एकदा मॉइश्चरायझिंग क्रीम लावल्याने फायदा होणार नाही. म्हणून, तुम्ही तुमच्या बॅगमध्ये एक लहान मॉइश्चरायझर ठेवावे आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या हात, पाय किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागात कोरडेपणा जाणवेल तेव्हा मॉइश्चरायझिंग क्रीम वापरावे.

लिप बाम

ओठ हा आपल्या शरीराचा सर्वात नाजूक भाग आहे. त्यावर थंडीचा सर्वाधिक परिणाम होतो. हिवाळ्यात ते फुटू लागतात. तुम्ही तुमच्या पिशवीत चांगला लिप बाम किंवा व्हॅसलीन ठेवा आणि ते वेळोवेळी ओठांवर लावत राहावे.

स्ट्रिप्सिल किंवा विक्स

हिवाळ्यात घसा खवखवणे देखील सामान्य समस्या आहे. हे टाळण्यासाठी घसादुखीपासून मुक्त होण्यासाठी स्ट्रिप्सिल किंवा विक्स आपल्या बॅगमध्ये ठेवा आणि जेव्हा आपल्याला आवश्यक असेल तेव्हा ते वेळोवेळी खात राहावे.

स्कार्फ

थंडीच्या दिवसात कधीही हवामान बदलते आणि तापमान कमी होते. तुम्ही तुमच्यासोबत लोकरीचा स्कार्फ ठेऊ शकता आणि जेव्हा तुम्हाला त्याची गरज असेल तेव्हा तो तुमच्या गळ्यात गुंडाळा किंवा थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी कानावर बांधु शकता.

टिश्यु पेपर

थंडीच्या दिवसांमध्ये शिंका येणे किंवा खोकला येणे सामान्य आहे. रुमालाऐवजी टिश्यू पेपर सोबत ठेवावे आणि शिंकताना किंवा खोकताना वापरा आणि वापरल्यानंतर फेकून द्यावे.

सनस्क्रीन

जरी हिवाळ्याच्या काळात सूर्यकिरणे फारशी तीव्र नसतात. पण त्याच्या अतिनील किरणांचा त्वचेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे तुम्ही तुमच्या बॅगमध्ये सनस्क्रीन ठेवावे.

थर्मॉस बाटली

तुम्ही तुमच्या बॅगमध्ये पाण्याची छोटी बाटली ठेवावी. हिवाळ्याच्या दिवसात अशी बाटली तुमच्या बॅघमध्ये ठेवा ज्यामुळे पाणी जास्त काळ गरम राहते. त्यात गरम पाणी टाकून पिऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

Health Tips: स्वतःकडे बरंच दुर्लक्ष होतंय, वेळ मिळत नाहीये; नेमकं करावं तरी काय?

Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

SCROLL FOR NEXT