Relationship Bonding: प्रेम व्यक्त करण्यासाठी 'किस' (Kiss) किती वेळ करायचा? याचे उत्तर प्रत्येकासाठी वेगवेगळे असेल, पण नात्यातील जवळीक आणि विश्वास वाढवण्यासाठी किसचा कालावधी किमान सहा सेकंद असणे गरजेचे आहे, असे जगभरातील अनेक तज्ज्ञांचे मत आहे.
डॉ. जॉन गॉटमन यांच्या संशोधनानुसार, इतका वेळ किस केल्यावरच आपल्या शरीरात 'ऑक्सिटोसिन' नावाचे खास रसायन पुरेशा प्रमाणात तयार होते. या रसायनाला 'बॉंडिंग हार्मोन' (Bonding Hormone) म्हणजेच 'बंध निर्माण करणारे संप्रेरक' असेही म्हणतात. डॉ. गॉटमन यांच्या मते, जाणीवपूर्वक आणि जास्त वेळ किस केल्यास जोडीदांरामध्ये मजबूत विश्वास निर्माण होतो. याबाबत तज्ज्ञ डॉ. नेहा पराशर यांनीही सविस्तर सांगितले.
डॉ. नेहा पराशर यांनी सहा सेकंदांच्या किसच्या महत्त्वावर शिक्कामोर्तब केला. "होय, सहा सेकंदांच्या किसमुळे ऑक्सिटोसिन हे रसायन पुरेशा प्रमाणात तयार होते."
ऑक्सिटोसिनचे काम: हे एक महत्त्वाचे न्यूरोकेमिकल आहे, जे सामाजिक बंध, विश्वास आणि जवळीक वाढवण्यात मोठी भूमिका बजावते.
'फील-गुड' रसायने: डॉ. पराशर सांगतात की, "जेव्हा तुम्ही किमान सहा सेकंद किस करता, तेव्हा तुमच्या मेंदूत ऑक्सिटोसिनसह अनेक 'आनंदी' (Feel-good) रसायनांचे संकेत मिळतात."
डॉ. पराशर सांगतात, सहा सेकंदांचा किस म्हणजे दैनंदिन जीवनातील धावपळीला ब्रेक लावून केवळ जोडीदारासाठी पूर्ण वेळ देणे होय. "घाईघाईत गालावर पटकन घेतलेली पप्पी तितकी प्रभावी नसते. कारण, तुमच्या मेंदूला ही शक्तिशाली रसायने सोडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही."
ऑक्सिटोसिनमुळे तुमच्यातील 'मी-माझे' ही भावना कमी होते आणि जोडीदारासोबत जवळीक व सुरक्षितता वाढते. मिठी मारणे, कुशीत घेणे किंवा बाळाला स्तनपान करतानाही हेच हार्मोन तयार होते, ज्यामुळे नाते अधिक घट्ट होते. रोमँटिक नात्यात हे रसायन तुमची भावनिक बंध मजबूत करते. त्यामुळे सहा सेकंदांचा किस ही फक्त एक शारीरिक कृती नसून प्रेमाची भावना बायोकेमिकल पातळीवर व्यक्त करण्याची एक प्रभावी पद्धत आहे.
किसचा कालावधी महत्त्वाचा असला तरी, तो एकमेव उपाय नाही. हे तुमच्या नात्याला अधिक सुंदर बनवणारे एक छोटे पण प्रभावी साधन आहे.
आनंद आणि भावनिक बंध: जे जोडपे जास्त वेळा किस करतात, ते नात्यात जास्त आनंदी आणि एकमेकांशी अधिक जोडलेले असल्याचा अनुभव घेतात.
गुणवत्ता महत्त्वाची: डॉ. पराशर सांगतात की, किसची गुणवत्ता (Quality) महत्त्वाची आहे. सहा सेकंदांचा किस हे दर्शवतो की, तुम्ही फक्त औपचारिकता म्हणून किस करत नाही आहात, तर तो अर्थपूर्ण बनवत आहात.
नात्याचे आरोग्य: किस हे तुमच्या नात्याच्या आरोग्याचा 'तापमापक' (Barometer) म्हणून काम करते. किस करण्याची वारंवारता कमी झाल्यास नात्यात दुरावा येत असल्याचे संकेत मिळू शकतात, तर जाणीवपूर्वक केलेला किस नात्यातील उत्साह परत आणतो.
डॉ. पराशर स्पष्ट करतात की, सहा सेकंद हे केवळ मार्गदर्शक तत्त्व आहे. आदर्श कालावधी प्रत्येकाच्या आवडीनुसार बदलू शकतो.
नैसर्गिक किस: "किसचा वेळ मोजत बसणे तणावपूर्ण ठरु शकते. यामुळे तुम्ही त्या क्षणापासून दूर जाता. किस नैसर्गिक असावा, तो जबरदस्ती म्हणून करु नये.''
भावना महत्त्वाची: जबरदस्तीने किस केल्यास नात्यातील सहजता (Authenticity) आणि जवळीकता कमी होते. त्यामुळे वेळेवर लक्ष न देता तुम्हाला कसे वाटतेय यावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. नात्यातील आनंदासाठी संवाद खूप महत्त्वाचा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.