Relationship Tips: नातं तुटण्यापूर्वीचा 'Last Call': वेळीच ओळखा या 'Silent' चुका आणि वाचवा आपलं प्रेम

Akshata Chhatre

सहजीवन

दोन व्यक्तींना एकत्र येऊन सहजीवन अनुभवावेसे वाटते, तेव्हा त्याचा अर्थ त्यांचे नाते घट्ट आहे. मात्र, काही काळानंतर अनेक जोडप्यांमध्ये ताणतणाव निर्माण होऊ लागतात आणि त्याचा परिणाम नात्यावर होतो.

relationship mistakes|early signs of breakup | Dainik Gomantak

जोडपी

अनेकदा याच चुकांमुळे जोडपी एकमेकांपासून कायमची दूर होतात. चला पाहूया, कोणत्या चुका नात्यासाठी सर्वात हानिकारक ठरतात.

relationship mistakes|early signs of breakup | Dainik Gomantak

मोठे अंतर

बऱ्याच जोडप्यांमध्ये वयाचे मोठे अंतर असते. सुरुवातीला सर्व काही ठीक वाटत असले, तरी हळूहळू ते अनेक गोष्टींवर असहमत होऊ लागतात. एका जोडीदारासाठी ज्या गोष्टी योग्य असतात, त्या दुसऱ्यासाठी नसतात.

relationship mistakes|early signs of breakup | Dainik Gomantak

स्पर्धात्मक वृत्ती

नात्यांमध्ये स्पर्धात्मक भावना वाढल्यास ते बिघडू शकते. "मी हे केले, मी ते केले" या विचारांमुळे नाते कमकुवत होते. त्याचप्रमाणे, अनेक जोडपी खूप हट्टी असतात आणि त्यांना वाटते की ते कधीही चुकीचे असू शकत नाहीत.

relationship mistakes|early signs of breakup | Dainik Gomantak

गोष्टी शेअर न करणे

ज्या जोडप्यांमध्ये गोष्टी शेअर केल्या जात नाहीत, त्यांच्या नात्यात अनेकदा दुरावा निर्माण होतो. काही जोडप्यांमध्ये, एक जोडीदार नेहमी गोष्टी सांगत असतो, पण दुसरा त्यामध्ये सहभागी होत नाही.

relationship mistakes|early signs of breakup | Dainik Gomantak

वाद आणि भांडणे

नात्यात वाद आणि भांडणे होणे नैसर्गिक आहे, पण भांडण जास्त काळ टिकवून ठेवल्याने तुमचे नाते कमकुवत होते. यामुळे एकमेकांबद्दलचा राग वाढतो.

relationship mistakes|early signs of breakup | Dainik Gomantak

संवाद

एक चांगले आणि दीर्घकाळ टिकून राहणारे नाते निर्माण करण्यासाठी विश्वास, समजून घेणे, संवाद आणि लवचिकपणा आवश्यक आहे. या चुका टाळल्यास तुमचे नाते अधिक मजबूत होऊ शकते.

relationship mistakes|early signs of breakup | Dainik Gomantak

Being Single Benefits: सिंगल लोक असतात जास्त आनंदी, का ते जाणून घ्या?

आणखीन बघा