Right Place For Wind Chimes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Right Place For Wind Chimes: घरात कोणत्या दिशेला विंड चाइम लावणे मानले जाते शुभ?

अनेक लोक घराची शोभा वाढवण्यासाठी विंड चाइम लावतात, पण त्याची योग्य दिशा कोणती आहे हे माहिती नसते.

Puja Bonkile

Right Place For Wind Chimes: घरात सजावटीसाठी आपण अनेक गोष्टींचा वापर करतो. अनेक लोक वाऱ्याच्या दिशेला विड चाइम्स लावणं शुभ मानतात. विंड चाइम्सची तो आवाज घरातलं वातावरण आनंदी ठेवते असे मानले जाते.

तसेच विंड चाइम्समुळे घरात भरभराट येण्यास मदत मिळते. जर तुम्हीही घरात विंड चाइम्स लावत असला तर त्याची योग्या दिशा माहिती असणे गरजेचे आहे.

  • सकारात्मक ऊर्जा

विंड चाइम्स हे केवळ घराच्या सजावटीसाठी आणि शो पिसची वस्तू नसून त्याने घर आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहाते. विंड चाइम्स खरेदी करताना त्यातील साहित्य आणि त्यातील रॉडची संख्या लक्षात ठेवणे गरजेचे असते.

  • नैऋत्य दिशा

लोकांनी तुमचा आदर करावा असे तुम्हाला वाटत असेल तर किंवा अशा लोकांच्या श्रेणीत तुमचा समावेश असेल तर तुमच्या लिव्हिंग रूमच्या नैऋत्य कोपऱ्यात 2 किंवा 9 रॉडचा विंड चाइम लावने शुभ मानले जाते. नोकरीत प्रगती हवी असेल तर पिवळ्या रंगाचा विंड चाइम उत्तर-पश्चिम दिशेला लावावा.

  • विंड चाइम बांबूचा अधिक फायदेशीर

विंड चाइम बांबूचा असेल तर त्यामध्ये रॉडची संख्या 3 ते 4 असावी. या प्रकारचा विंड चाइम घरामध्ये (Home) लावल्यास त्याच्या गुणधर्माचा जास्त फायदा मिळू शकतो. ज्यामुळे घर किंवा ऑफिसमध्ये (Office) सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

  • विंड चाइम मोठा असावा

विंड चाइम कोणत्या ठिकाणी लावावे याला कुप महत्व आहे. तुम्हाला बागेत विंड चाइम लावायचा असेल तर तो मोठा लावावा. लहान विंड चाइम लावल्यास तो दिसणार नाही तसेच वाऱ्याने त्याचा होणारा आवाज देखील ऐकायला येणार नाही.

  • फेंगशुईनुसार योग्य दिशा

विंड चाइम योग्य दिशेला लावल्यास त्याचा फायदा होतो. फेंगशुईमध्ये दक्षिण-पूर्व आणि पूर्व दिशा ही झाडे आणि लाकडाशी संबंधित मानली जाते. त्यामुळे या दिशेला लाकडी विंड चाइम लावल्यास अधिक लाभ मिलू शकते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT