Cough Syrup Side Effects: लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कफ सिरपमुळे होऊ शकते नुकसान, वाचा सविस्तर

'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'च्या अहवालानुसार कफ सिरपमध्ये डायथिलीन आणि इथिलीन ग्लायकॉल आढळले आहेत. ते जास्त प्रमाणात घेतल्यास आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
Cough Syrup Side Effects
Cough Syrup Side EffectsDainik Gomantak
Published on
Updated on

Cough Syrup side effects: वातावरणातील बलणांमुळे अनेक लोकांना सर्दी, खोकला यासारख्या समस्या निर्माण होतात. यावर उपाय म्हणून अनेक लोक कफ सिलपचा वापर करतात. कारण कफ सिरप हे देखील आपल्या सर्वांसाठी एक सामान्य औषध आहे. 

पण तुम्हाला माहित आहे का की कफ सिरपचा जास्त वापर केल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. काही लोक झोप येण्यासाठी कफ सिरपचे सेवन करातात. पण असे केल्याने म्हणजेच खोकला न होता कफ सिरप प्यायल्याने शरीराला घातक परिणामांना सामोरे जावे लागते. 

कधीकधी कफ सिरप देखील घातक ठरू शकते. म्हणूनच कोणते सिरप किंवा औषध किती प्रमाणात घ्यावे किंवा कोणते औषध घ्यावे याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.  

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अहवालानुसार, कफ सिरपमध्ये (Cough Syrup) डायथिलीन आणि इथिलीन ग्लायकॉल आढळले आहेत. ते जास्त प्रमाणात घेतल्यास नुकसान होऊ शकते. कडू खोकल्यावरील औषध पिण्यास सक्षम नसल्यामुळे ते कफ सिरपमध्ये मिसळले जाते. चला जाणून घेऊया कफ सिरपचे दुष्परिणाम कोणते आहेत.  

  • कफ सिरपचे दुष्परिणाम काय आहेत?

तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार नेहमी Cough Syrup वापरावे. त्याचा डोस स्वतःहून कधीही वाढवू नका, असे केल्याने तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

Cough Syrup चे दुष्परिणाम

  • हृदय गती वाढणे

  • चक्कर येणे

  • अशक्त वाटणे

  • अंधुक दृष्टी

  • मळमळ

  • उलट्या

  • झोपेची समस्या

  • डोकेदुखी

जास्त प्रमाणात कफ सिरपचे सेवन केल्यास तुमच्या हृदयाचे आरोग्य धोक्यात येउ शकते. यापैकी कोणतीही लक्षणे दीर्घकाळ टिकून राहिल्यास किंवा तीव्र झाल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Cough Syrup Side Effects
Rudraksha Wearing Rules and Effects: रुद्राक्ष एकाग्रता वाढण्यासह अनेक संकटांना ठेवते दूर, जाणून घ्या 1,2,3 अन् 4 मुखी रुद्राक्षाचे फायदे
  • कफ सिरप कसे वापरावे?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही तुमच्या खोकल्यावर उपचार स्वतः करत असाल तर कोणतेही औषध किंवा सिरप घेण्यापूर्वी त्यावर लिहिलेल्या गोष्टी वाचा आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर सिरप विकत घेणे आरोग्यदायी ठरेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की कफ सिरपचा डोस तुमचे वय, तुम्हाला होणारा त्रास आणि उपचार यावर अवलंबून असतो. 

  • कफ सिरप खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या

औषधाच्या बॉटलवर लिहिलेल्या गोष्टींकडे लक्ष द्यावे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने सिरप किंवा औषध घ्यावे.
डॉक्टरांना तुमचा डोस विचारावा.
नेहमी डोस मोजा आणि मगच घ्यावा.
वयानुसार डोस घ्यावा.

औषधोपचार करूनही तुमची लक्षणे एका आठवड्याच्या आत कमी होत नसेल किंवा तुम्हाला डोकेदुखीसारखी इतर लक्षणे जाणवत असतील तर लगेच ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

औषध घेतल्यानंतर तुमच्या हृदयाचे ठोके वाढले, स्वभावात बदल, अस्वस्थता, लघवीला त्रास किंवा चक्कर येत असल्यास, औषध ताबडतोब बंद करावे.

  • खोकला किंवा सर्दीवर घरगुती उपाय

घरगुती उपायांमध्ये तुम्ही आल्याचा रस, मध आणि गरम सूप पिऊ शकता. यामुळे त्वरित आराम मिळू शकतो.

कोमट पाणी, गरम सूप, चहा इत्यादींच्या सेवनानेही आराम मिळतो.

तुम्ही वाफ घेऊ शकता, यामुळे घशातील कोरडेपणा दूर होतो.

मिठाच्या पाण्याने गार्गल करावे. यामुळे घशातील वेदना आणि सूज कमी होते.

Cough Syrup Side Effects
Eco Friendly Traveling Tips: इको फ्रेंडली ट्रॅव्हलचा आनंद लुटण्यासाठी फॉलो करा 'या' 5 खास टिप्स
  • डॉक्टरांकडे कधी जावे?

खोकला ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी अनेक वेळा खोकला आणि कफ शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरतात. अशावेळी बरेच लोक कफ सिरप वापरतात, परंतु त्याचे काही दुष्परिणाम देखील होतात. 

तज्ज्ञांच्या मते, कफ सिरप प्यायल्याने डोकेदुखी, चक्कर येणे आणि झोपेत अस्वस्थता जाणवत असेल, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

कफ सिरप घेतल्याने मूड बदलणे, भ्रम, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, हात आणि पाय यांना हादरे बसणे आणि अशक्तपणा जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

त्वचेवर पुरळ, खाज किंवा कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com