WhatsApp Dainik Gomantak
लाइफस्टाइल

WhatsApp New Feature: व्हिडिओ कॉलिंगची मजा होईल द्विगुणित, व्हॉट्सअ‍ॅपने लाँच केले दमदार फिचर

व्हॉट्स अ‍ॅपमध्ये एक दमदार फिचर लाँच झाले असून या फिचरद्वारे तुम्ही व्हिडिओ कॉलिंगदरम्यान स्क्रिन शेअर करू शकता.

Puja Bonkile

WhatsApp Video call Screen Sharing New Feature: व्हॉट्स अ‍ॅपमध्ये एक दमदार फिचर लाँच केले आहे. या फिचरद्वारे युजर्स व्हिडिओ कॉलिंगदरम्यान स्क्रिन शेअर करू शकणार आहेत. मेटाचे सीईओ झुकरबर्ग यांनी फेसबुकवर हे फिचर लाँच केले आहे.

मार्कने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की 'आम्ही व्हिडिओ कॉल दरम्यान व्हॉट्स अ‍ॅप स्क्रिन शेअर करू शकता. खास म्हणजे चांगल्या स्क्रिन व्ह्युसाठी युजर्स लँडस्केप मोडमध्ये देखील व्हिडिओ कॉलिंग करू शकतात.

स्किन शेअर करण्यासाठी युजर्सला शेअर आयकॉनवर क्लिक करावे लागेल. येथे युजर्सला खास अ‍ॅप्लेकिशन मिळेल जे स्क्रिन शेअर करण्यासाटी मदत करेल.

कंपनीने या फिचरबद्दल बोलतांना सांगितले की, ऑफिसमधील डॉक्युमेंट शेअर करणे, कुटूंबासोबत फोटो ब्राउजर शेअर करणे, सुट्ट्यांचे प्लॅनिंग करणे, ऑनलाइन शॉपिंग करणे, या सारखी कामे या फिचरद्वारे करता येणार आहे.

अलिकडेच व्हॉट्अ‍ॅपने चॅट लाँक फिचर लाँच केले होते. या फिचरमध्ये युजर पर्सनल चॅट लॉक करू शकतो. या फीचरनंतर, फक्त तुम्ही तुमच्या चॅट्समध्ये प्रवेश करू शकाल. यासाठी तुम्हाला डिव्हाईस पिन किंवा बायोमेट्रिक्स लॉक वापरावे लागेल. 

हे फिचर फिंगरप्रिंट लॉक किंवा फेस लॉकसह देखील काम करते. म्हणजेच, जर तुम्ही चॅट लॉक केले असेल तर ते उघडण्यासाठी तुम्हाला पिन, फिंगरप्रिंट किंवा फेस लॉकचा वापर करावा लागेल. तुम्ही चॅट लॉक करताच, WhatsApp मधील मजकूर चॅट सूचनांमधून हाइड करते.

  • हे फिचर कसे कार्य करते

व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 

सर्वप्रथम तुम्हाला अ‍ॅपओपन करावे लागेल. 

यानंतर तुम्हाला कोणत्याही चॅटवर जावे लागेल.

वैयक्तिक किंवा ग्रुपच्या नावावर टॅप करावे लागेल. 

येथे तुम्हाला स्क्रोल करून खाली जावे लागेल जिथे तुम्हाला लॉक चॅटचा पर्याय मिळेल. 

आता तुम्हाला तुमचा पासवर्ड किंवा बायोमेट्रिक्स सत्यापित करावे लागतील. 

अशा प्रकारे तुम्ही कोणतीही चॅट लॉक करू शकता. 

हे फिचर सर्व युजर्ससाठी आणले गेले आहे. येत्या काही दिवसांत हे फीचर सर्व यूजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. जर हे फीचर तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर दिसत नसेल तर तुम्हाला अ‍ॅप अपडेट करावे लागेल. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT