Divorce Relationship Tips: घटस्फोट टाळाचाय? कोणत्या वयात लग्न करणे योग्य, अभ्यासातून आली महत्वाची माहिती समोर

एका अभ्यासात असे समोर आले आहे की लग्न हे वय पाहून नाही तर जेव्हा तुम्ही मानसिकरित्या तयार असता तेव्हाच करावे.
Relationship Tips
Relationship TipsDainik Gomantak

How to avoid Divorce: लग्न केल्याने आयुष्य आनंदाने भरून जाते असा अनेक लोकांचा समज आहे.

भारतीय समाजात विवाहाला सर्वाधिक महत्त्व आहे. तरीसुद्धा ही गोष्ट पण खरी आहे की लग्न करण्यासाठी योग्य वय कोणते हे माहिती असणे गरजेचे आहे.

कायद्यानुसार प्रत्येक देशात लग्न करण्याचे योग्य वय ठरवलेले आहे. भारतात हे वय मुलींसाठी 18 तर मुलांसाठी 21 आहे. पण यामध्ये अनेक वेळा बदल करण्याची मागणी केली गेली आहे.

कायद्याचा विचार न करता पाहिले तर लग्न तेव्हाच करावे जेव्हा तुम्ही शारिरिकरित्या, मानसिकरित्या आणि आर्थिकरित्या तुम्ही सक्षम असता. तोपर्यंत लग्नाचा विचार देखील करू नका. असा विचार करणे चुकीचे नाही.

पण समाज तसा विचार करत नाही, त्यानुसार योग्य वयात लग्न केल्याने माणसाचे आरोग्य, नातेसंबंध आणि आयुष्य आनंदी होते. तुम्‍ही या कल्पनेशी सहमत नसल्‍यावरही तुम्‍हाला हे ऐकून आश्‍चर्य वाटेल की, नुकतेच झालेले संशोधनही याला समर्थन देते.

Relationship Tips
"Antidepressants च्या दुष्परिणांबद्दल त्यांनी सांगितलेच नाही..." डिप्रेशनमुळे आत्महत्या केलेल्या तरूणाची व्यथा
Marriage
MarriageDainik Gomantak

युटा विद्यापीठातील समाजशास्त्रज्ञ निक वोल्फिंगर यांनी केलेल्या अभ्यासानुसार , 28 ते 32 वयोगटातील विवाहित लोकांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण खूपच कमी आहे.

किमान पहिली पाच वर्षे पती-पत्नीमध्ये घटस्फोट होण्याची शक्यता नाही .

  • या वयोगटात घटस्फोट होण्याची अधिक शक्यता

वोल्फिंगरने 2006-2010 आणि 2011-2013 नॅशनल सर्वे ऑफ फॅमिली ग्रोथमधील डेटाचे विश्लेषण केले. यामध्ये त्यांना असे आढळले की घटस्फोटाची शक्यता तुमच्या वयानुसार कमी होत जाते.

त्यानंतर, तुम्ही तिशीच्या नंतर आणि चाळीशीच्या सुरुवातीस असता तेव्हा घटस्फोटाची शक्यता असते. सुमारे 32 नंतर, घटस्फोटाची शक्यता प्रत्येक वर्षी 5% वाढू लागते.

  • या वयात लग्न करणे फायदेशीर

20 ते 30 हे वय वर्ष लग्नासाठी उत्तम आहे. या वयात एकमेकांना समजुन घेण्याची शक्यता अधिक असते.

तसेच कुटूंबाचा विचार करण्यासाठी देकील हे वय योग्य आहे. म्हणून या वयात लग्न करणे फायदेसीर ठरते.

  • अभ्यासामध्ये काय दावा करण्यात आला आहे

या विषयाचा अभ्यास करणारे आणखी एक समाजशास्त्रज्ञ मेरीलँड विद्यापीठाचे फिलिप कोहेन यांनी अमेरिकन कम्युनिटी सर्व्हे डेटाचा अभ्यास करताना सांगितले आहे की, जास्त वयात लग्न करणे म्हणजे ते जास्त काळ टिकण्याची शक्यता कमी आहे असे नाही.

त्यांच्या विश्लेषणानुसार, जर तुम्हाला घटस्फोट टाळायचा असेल तर 45 ते 49 या वयोगटात लग्न करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com