Goa Carnival 2024
Goa Carnival 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Carnival In Goa: फेब्रुवारी महिना पर्यटकांसाठी ठरणार मनोरंजनाची मेजवानी

Shreya Dewalkar

Carnival In Goa: गोवा कार्निव्हल हा पोर्तुगीज राजवटीचा वारसा आहे. हा गोव्याच्या परंपरेचा एक भाग असून या कार्निव्हलमुळे भारत आणि परदेशातील हजारो पर्यटकांना आकर्षित केले आहे. राज्यातील कार्निव्हलचा मूळ इतिहास प्राचीन रोमन साम्राज्यापर्यंत पसरलेला आहे. नेत्रदीपक परेड, नृत्य, संगीत कार्यक्रम आणि उत्कृष्ट भोजनाने समृध्द हा कार्यक्रम असतो.

पणजी, म्हापसा, माडगाव आणि वास्को या शहरांमध्ये कार्निव्हल होत असतात. यामध्ये पणजीमधील कार्निव्हल हे सर्वांत मोठे असते.

किंग मोमो

किंग मोमो म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका नाममात्र नेत्याची उत्सवापूर्वी निवड केली जाते, ज्याला चार दिवस राज्य करण्यासाठी राज्याची जबाबदारी दिली जाते. साधारणपणे, जगभरातील प्रथेनुसार, यासाठी लठ्ठ, आनंदी व्यक्तीची निवड केली जाते. गोवन कार्निव्हलचा किंग मोमो 'खा, पियेआनिमज्जकर' अर्थात 'खा, प्या आणि आनंद घ्या' या संदेशासह या कार्निव्हलमध्ये दमदार एन्ट्री करतो.

गोव्यातील कार्निवलचे महत्त्व

गोवा कार्निव्हल हा एक उत्सव अनेक उद्देश पूर्ण करतो. एकीकडे, ते राज्यात राहणाऱ्या विविध समुदायांच्या लोकांमध्ये एकोपा टिकवुन ठेवण्यासाठी मदत करतो तर दुसरीकडे, तो गोव्याला पर्यटकांचे लोकप्रिय ठिकाण म्हणून प्रस्तुत करते. गोवा कार्निव्हल उत्सवाद्वारे राज्यातील संस्कृती आणि परंपरा दाखवल्या जातात. गोवा कार्निव्हल उत्सव राज्यभरात अनेक ठिकाणी उत्सव साजरा केला जात; मात्र कार्निव्हलचा केंद्रबिंदू पणजी आहे.

परेड आणि फ्लोट्स

पणजीमध्ये सर्वात मोठा उत्सव असतो यामध्ये आकर्षक सजवलेले कार्निव्हल फ्लोट्स रस्त्यांवर दिसतात. त्यांच्यासोबत पोशाखात नाचणारे पुरुष आणि स्त्रिया तसेच मत्स्य आकाराचे मोठे फ्लोट्स, मोठे डोके असलेले विदूषक पहायला मिळतात.

स्टॉल्स

गोव्याच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारी छोटी नाटकेही आयोजित केली जातात. निरनिराळे संगीतकार त्यांचे वाद्य वाजवताना मोठ्या प्रमाणात मनोरंजन करतात. कलेच्या इतर प्रकारांचे प्रतिनिधित्व संबंधित कलाकारांद्वारे केले जाते. या ठिकाणी तुम्हाला फूड स्टॉल्स देखील पहायला मिळतात.

परेड सुरू करणारा कार्निव्हल फ्लोट

प्राचीन रोमच्या मूर्तिपूजक परंपरेत उत्पत्ती असल्याने, लोक हिवाळ्यासाठी सर्व गोळा केलेले अन्न खाऊन टाकतात जेणेकरून त्यांचा क्षय होऊ नये, हा भव्य उत्सव ख्रिश्चन परंपरेप्रमाणे साजरा केला जातो. ख्रिश्चन लीटर्जिकल कॅलेंडरने लेंटच्या कालावधीच्या सुरुवातीच्या दिवसांना शेवटचा कालावधी म्हणून चिन्हांकित केले. लेंट हा उपवास आणि तपस्याचा काळ मानला जातो, ज्यामध्ये मांसाहारापासून दूर राहतात.

अशा प्रकारे लेंट सुरू होण्यापूर्वीचा कालावधी आनंद आणि मेजवानीचा अंतिम दिवस म्हणून साजरा केला जातो, जो कार्निव्हलमध्ये आयोजित केला जातो. संपूर्ण ख्रिश्चन धर्मामध्ये साजरे केले जातात, परंतु मुख्यतः रोमन कॅथलिकांद्वारे. पोर्तुगीज, जे बहुतेक रोमन कॅथलिक धर्माला अनुसरून असतात, राज्यात 1961 ला प्रथमच कार्निव्हल सुरुवात झाली असे मानले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT