Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Mhadei Sanctuary Dispute: म्‍हादई अभयारण्याचा व्याघ्र प्रकल्पात समावेश न केल्याने गुंतागुंत वाढली आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वस्तीसाठी परवानगी असते मात्र अभयारण्यात नसते.
Goa Forest
Mhadei SanctuaryDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: म्‍हादई अभयारण्याचा व्याघ्र प्रकल्पात समावेश न केल्याने गुंतागुंत वाढली आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वस्तीसाठी परवानगी असते मात्र अभयारण्यात नसते, असे गोवा फाऊंडेशनचे संचालक क्लॉड आल्वारिस यांनी नमूद केले.

गोमन्तकशी बोलताना ते म्हणाले, म्हादई अभयारण्याच्या सीमा ठरवण्यासाठी सरकारकडे एक वर्ष आहे. अभयारण्यात वस्तीसाठी परवानगी नसल्याने स्थलांतर, विस्थापन हे ठरून गेलेले असते. व्याघ्र प्रकल्पात तो भाग बफर झोनमधून समाविष्ट झाला असता तर हे प्रश्न निर्माण झाले नसते. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ३८ एल अंतर्गत व्याघ्र प्रकल्प येतो त्यात बफर झोनमध्ये अनेक गोष्टींना मुभा असते ती अभयारण्यात नसते.

Goa Forest
Mhadei Sanctuary: पूर्वजांनी राखलेले, बारमाही धबधब्यांनी सजलेले, पट्टेरी वाघांमुळे समृद्ध झालेले सत्तरीचे वैभव 'म्हादई जंगल'

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) केंद्रीय सक्षम समितीने दिलेल्या अहवालावर थेट मतप्रदर्शन करणे त्यांनी टाळले, ते म्हणाले, व्याघ्र प्रकल्प जाहीर करावा अशी शिफारस समितीने केल्याचे स्वागत केले पाहिजे. असे असले तरी त्यांच्या शिफारशींचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. १५ डिसेंबरपूर्वी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून आम्ही आमचे म्हणणे मांडू. समितीचे म्हणणे दोन्ही बाजूकडून मान्य झाले तर प्रश्नच मिटेल. सरकारने आपली भूमिका २४ तासानंतरही जाहीर केलेले नाही किंवा प्रतिक्रीयाही दिलेली नाही. त्यामुळे काय होईल हे सांगता येत नाही.

समितीची ती शिफारस कायदेशीर पेच निर्माण करणारी

भगवान महावीर अभयारण्याचा काही भाग व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन म्हणून अधिसूचित करणाची समितीची शिफारस कायदेशीर पेच निर्माण करणारी आहे. अभयारण्यांत कोअर झोन व बफर झोन असतो. अभयारण्यात व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन असू शकत नाही. त्यातून अंमलबजावणीची कायदेशीर गुंतागुंत निर्माण होणार आहे. अभयारण्याच्या बाहेर बफर झोन असू शकतो. ४ हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आकाराचा व्याघ्र प्रकल्प शिफारशीत आहे ही चांगली बाब आहे. इतर भाग समितीने वगळलेला नाही तो अभयारण्यच आहे आणि अभयारण्याचे कायदे व्याघ्र प्रकल्पापेक्षा कडक आहेत असे आल्वारिस म्हणाले.

१. क्‍लॉड म्हणाले, सुरवातीला १२७४ कुटुंबातील ५ हजार जण विस्थापित होतील असे चित्र होते. आता म्हादईचा भाग त्यांनी विचारात घेतलेला नाही. भगवान महावीर अभयारण्याचा उत्तरेकडील भागही विचारात घेतलेला नाही.

Goa Forest
Mhadei Sanctuary: म्हादई अभयारण्याला गैरप्रकारांचा विळखा! बसवेश्वर मंदिरात तोडफोड, आगीच्या घटना; कडक कारवाईची होतेय मागणी

२. या दोन्ही ठिकाणी वरील उल्लेख केलेल्या आकडेवारीपैकी बहुतांश वस्ती आहे. नेत्रावळी व खोतिगावमध्ये किरकोळ वस्ती आहे. आम्ही कोअर झोन व बफर झोन अशी वेगवेगळी शिफारस केली होती.

३. समितीने आता खोतिगाव आणि नेत्रावळी पूर्ण अभयारण्यांना कोअर झोन जाहीर करण्याची शिफारस केली आहे तो प्रश्न आहे. आम्ही विचार करताना बफर झोनमधील वस्तीचा वेगळा विचार केला होता. आता पूर्णच कोअर झोन होणार असल्याने वस्तीची आकडेवारी निश्चितच वाढेल. सर्व मिळून ५० घरे असणार नाहीत.

४. आता केवळ म्हादई अभायरण्य व काले रेल्वे स्थानक परिसराचा विषय आहे. या भागात मोठी वस्ती आहे. आम्ही समितीला सांगितले आहे की यातील वस्ती अभयारण्यात दिसते तरी प्रत्यक्षात नसते नाही. अभयारण्यांच्या बाहेर ही वस्ती आहे. उदाहरणादाखल सांगतो, सत्तरीतील (Sattari) हिवरे खुर्द व हिवरे बुद्रूक ही गावे म्हादई अभयारण्यात दिसत असली तरी वस्ती व शेती अभयारण्याबाहेर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com