Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

Congress Forward RGP Alliance: येत्‍या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स (आरजीपी) या तीन पक्षांनी युती करण्‍याचे निश्‍चित केले आहे.
Congress Forward RGP Alliance
Congress Forward RGP AllianceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: येत्‍या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स (आरजीपी) या तीन पक्षांनी युती करण्‍याचे निश्‍चित केले आहे. परंतु, जागावाटपाबाबतचा निर्णय मात्र उच्च न्‍यायालयाच्‍या आरक्षणासंदर्भातील निर्णयानंतरच घेण्‍यात येणार असल्‍याचे तिन्‍हीही पक्षांनी ठरवले आहे.

दुसरीकडे, आम आदमी पक्षही (आप) भूमिका बदलून विरोधकांच्‍या युतीत सहभागी होऊ शकतो, असा दावा आरजीपीचे अध्‍यक्ष मनोज परब यांनी मंगळवारी केला असला, तरी ‘आप’ला युतीत घेण्‍यास काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी मात्र स्‍पष्‍ट नकार दिला आहे.

Congress Forward RGP Alliance
Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

२०२७ च्‍या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानल्‍या जात असलेल्‍या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत युती करून सत्ताधारी भाजपचा पराभव करण्‍यासाठी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई आणि आरजीपीचे अध्‍यक्ष मनोज परब (Manoj Parab) यांनी युतीस आधीच मान्‍यता दिलेली होती. परंतु, काँग्रेसकडून मात्र त्‍याबाबत स्‍पष्‍ट संकेत मिळत नव्‍हते.

Congress Forward RGP Alliance
Goa ZP Election: मनोज परब आणि सरदेसाईंना हव्या असणाऱ्या जागा वगळता काँग्रेसची यादी फायनल, लवकरच होणार जाहीर; पाटकरांनी स्पष्टच सांगितलं

अखेर यासंदर्भात काँग्रेसने स्‍थापन केलेल्‍या सात जणांच्‍या समितीने सोमवारी युतीस मान्‍यता दर्शवल्‍यानंतर काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी फॉरवर्ड आणि आरजीपी या दोन पक्षांशी युती करण्‍यास ‘हिरवा कंदील’ दाखवला. त्‍यानंतर जागा वाटपाबाबत या तिन्‍ही पक्षांच्‍या प्रमुखांत मंगळवारी बैठक होणार होती. पण, त्‍याआधीच जिल्‍हा पंचायत निवडणुकीतील आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्‍या याचिकांवरील निवाडा उच्च न्‍यायालयाने मंगळवारी स्‍थगित ठेवल्‍याने अंतिम निवाडा आल्‍यानंतरच जागा वाटपाची चर्चा पुढे नेण्‍याचा निर्णय तिन्‍ही पक्षांनी घेतल्‍याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर आणि आरजीपी अध्‍यक्ष मनोज परब यांनी दिली.

Congress Forward RGP Alliance
Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीची रणधुमाळी! आपची 22 नावे जाहीर; काँग्रेस-आरजी-फॉरवर्ड युतीचा होणार फैसला, भाजप लढवणार 50 जागा

‘आप’बाबत मनोजला विश्‍‍वास'

भाजपला (BJP) पराभूत करण्‍यासाठी राज्‍यातील सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे जनतेला वाटत होते, त्‍यामुळेच आरजीपी युतीस तयार झाल्‍याचे मनोज परब यांनी मंगळवारी सांगितले. सोबतच याआधी स्‍वतंत्र चूल मांडलेला आपही युतीत सहभागी होऊ शकतो. तसे झाल्‍यास काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही ते म्‍हणाले. पण, काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी मात्र आपला युतीत घेण्‍यास स्‍पष्‍ट नकार दर्शवला. युतीबाबत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीच्‍या नेत्‍यांत गेल्‍या काही महिन्‍यांपासून चर्चा सुरू आहेत. जागा वाटपाच्‍या चर्चाही अंतिम टप्‍प्‍यात आहे. अशा स्‍थितीत आपला युतीत सहभागी करून घेणे शक्‍य नसल्‍याचेही त्‍यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com